MP Bhavana Gavali | खा. भावना गवळींकडून जिवाला धोका; ‘या’ शिवसेना नेत्याचा खळबळजनक आरोप

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – नुकतंच शिवसेना नेत्या आणि खासदार भावना गवळी (Shiv Sena MP Bhavana Gavali) यांच्यामागे ईडीचा ससेमीरा लागला आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ED) काही दिवसापुर्वी खासदार गवळी यांच्या 5 संस्थावर छापेमारी केली आहे. दरम्यान, आता एका शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुखाने खा. भावना गवळी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची खा. भावना गवळी (Shiv Sena MP Bhavana Gavali) यांनी दिशाभुल केलीय. खासदारांकडुन माझ्या जीवाला धोका असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख हरीश सारडा (Harish Sarda) यांनी केला आहे. यावरुन आता सर्वत्र खळबळ उडाली आहे.

काय केले आहेत आरोप?
शिवसेनेचे (Shiv Sena) माजी उपजिल्हा प्रमुख हरीश सारडा (Harish Sarda) यांनी केलेल्या आरोपामुळे वाशीम (Washim) जिल्ह्यातील वाद उफाळला आहे. ‘माझ्यावर यापूर्वीही 2 वेळा हल्ले झाले. धमकी देण्यात येत आहे. पोलिसांनी सुरुवातीला संरक्षण दिले आणि नंतर काढून घेतले. पोलिस उपअधीक्षकांनी मोबाइल जप्त केला. अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. गवळी यांनी वाशीम जिल्ह्यातील रिसोड येथील 100 कोटी रुपयांचा श्री बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड कारखाना 25 लाख रुपयात खरेदी केला. त्यांचे खासगी सचिवांच्या भावना अ‍ॅग्रो प्रॉडक्ट अ‍ॅण्ड सर्व्हिसेसच्या नावावर हा व्यवहार झाला. हा घोटाळा उघडकीस आणल्यापासून धमक्यांचे फोन येत आहेत. असे हरीश सारडा (Harish Sarda) यांनी म्हटले आहे.

Bombay High Court | मुंबई उच्च न्यायालयाचा कंगनाला दणका ! सुशांत सिंह प्रकरणातील याचिका फेटाळली

याबाबत पोलिसांकडे तक्रार केल्यानंतरही अद्याप कारवाई झाली नाही. पोलिसांची खासदारांना साथ लाभली आहे. त्यांच्याकडून जीवाला धोका असल्याचे सारडा म्हणाले. तसेच पुढे ते म्हणाले की, शरद पवार यांनी गवळी यांची बाजू घेतली नाही.
ED च्या कारवाईबाबत गवळींनी खोटी माहिती देऊन पवारांची दिशाभूल केली. गवळी यांच्या 12 संस्था व 7 कंपन्या आहेत. 3 कंपन्यांच्या संचालक आहेत.
ही माहिती त्यांनी दडवली. सरकार वा पक्षाचे त्यांना कोणतेही समर्थन लाभलेले नाही.
मोठ्या नेत्यांचा आधार मिळावा, यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
राज्याच्या एका ज्येष्ठ नेत्याची दिशाभूल केल्याबद्दल गवळी यांनी शिवसैनिक तसेच, मतदारसंघ व राज्यातील जनतेची माफी मागावी, असं देखील सारडा (Harish Sarda) यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे सारडा (Harish Sarda) यांनी शिवसेना (Shiv Sena) सोडलेली नसल्याचं म्हटलं आहे. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांचीही गवळी यांनी दिशाभूल केलीय.
पाटील यांना त्यांनी खोटे पत्र दिल्यानंतर चौकशी बंद करण्यात आली.
हाय कोर्टातील याचिकेतही पाटील यांना पक्ष करण्यात येईल.
गवळी यांनी आरोप सिद्ध केल्यास महाराष्ट्र सोडू, अन्यथा त्या खासदारकीचा राजीनामा देतील का? असा देखील त्यांनी सवाल केला आहे.
खासदारांच्या इशाऱ्यावरून माझ्यावर गुन्हे दाखल केले.
17 नाही तर, 5 गुन्हेृ दाखल आहेत. यातील अ‍ॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा असून 4 गुन्हे IT शी संबंधित आहे. असं ते म्हणाले.

हे देखील वाचा

Pune Crime | 44 वर्षीय मोलकरणीशी घरमालकानं शरीर संबंध ठेवले, व्हिडीओ घरकाम करणार्‍या महिलेच्या पतीला पाठवला अन्…

Pune | मनोहर मामा आणि त्याच्या साथीदारांना तात्काळ अटक करा – मअनिस

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : MP Bhavana Gavali | washim shiv sena leader harish sarda attacks mp bhavana gawali

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update