MP Hemant Patil | हाजीर हो! आरक्षणासाठी राजीनामा देणारे शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांना राष्ट्रपतींचे समन्स

नवी दिल्ली : MP Hemant Patil | सध्या मराठा आरक्षणावरून राज्यात गोंधळ सुरू आहे. मध्यंतरी मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलकांनी लोकप्रतिनिधींना लक्ष्य केल्यानंतर काही मराठा आमदार, खासदार, पदाधिकारी यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. पैकी काहींनी मंजुर होऊ नयेत म्हणून जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने राजीनामे दिले होते. मात्र, शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील (MP Hemant Patil) यांनी थेट लोकसभा सभापतींकडे राजीनामा पाठवला होता. आता त्यांना राष्ट्रपतींकडून (President) समन्स बजावण्यात आले आहे.

हेमंत पाटील हे शिवसेनेच्या तिकीटावर हिंगोली लोकसभा मतदार संघातून (Hingoli Lok Sabha Constituency) निवडून आलेले खासदार आहेत. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (Shivsena) फूट पाडल्यानंतर हेमंत पाटील शिंदें गटात (Shinde Group) गेले. दरम्यान, मध्यंतरी मराठा समाजाचे आंदोलन तीव्र झाल्यानंतर लोकप्रतिनिधींना जाब विचारण्यात आला. यानंतर हेमंत पाटील यांनी २९ ऑक्टोबरला खासदारकीचा राजीनामा लोकसभा अध्यक्षांना पाठवला होता.

दरम्यान राजीनामा दिल्यानंतर हेमंत पाटील (MP Hemant Patil) संसदीय कामकाजापासून दूर होते. मात्र, आता त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समन्स जारी करत येत्या ४ डिसेंबरला लोकसभेत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, ३१ ऑक्टोबरला दिल्लीतील महाराष्ट्र सदनात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण केले होते.

हेमंत पाटीलांनी राजीनाम्यात नमूद केले होते की…
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) उपोषणास बसले आहेत.
त्यांची प्रकृती खालावत असून शासनाकडून कुठल्याच प्रकारची भूमिका घेतली जात नाही.
राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. अशा परिस्थिती समाजाच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर
लढणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही.
त्यामुळे समाजाच्या भावना लक्षात घेवून मी खासदारकीचा राजीनामा देत आहे.
आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला माझा पूर्णपणे पाठींबा आहे.
महाराष्ट्रातील मराठा बांधवांच्या भावना समजून घेवून राजीनामा देत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Accident News | पुणे : प्रेमविवाहाची इच्छा अधुरी, संसार थाटण्यापूर्वीच काळाचा घाला; ट्रक अपघातात जोडीदाराचा मृत्यू तर तरुणी गंभीर जखमी

Pune Crime News | कन्सलटन्सी कंपनीतील महिलेचा विनयभंग, डेक्कन परिसरातील प्रकार