MP Navnit Rana | ‘महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे सरकार नाही, ओवैसींनी मर्यादित रहावं’, खासदार नवनीत राणांचा ओवैसींना इशारा (व्हिडिओ)

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – एआयएमआयएमचे (AIMIM) प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी (MP Asaduddin Owaisi) यांनी नुकतीच बुलढाण्यात जाहीर सभा घेतली होता. या सभेत औरंगजेबाच्या (Aurangzeb) नावाने कथित घोषणाबाजी केल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आली. यावर राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया देताना ओवैसी यांच्यावर टीकास्त्र सोडलं. तर खासदार नवनीत राणा (MP Navnit Rana) यांनी प्रतिक्रिया देताना ओवैसींना थेट इशारा दिला आहे. ओवैसींनी आपल्या मर्यादेत रहावं. राज्यात औरंगजेबाच्या नावानं दिलेल्या घोषणा चालणार नाहीत, असा इशारा नवनीत राणा (MP Navnit Rana) यांनी दिला आहे.

बुलढाणा येथील सभेत औरंगजेबाच्या नावाने कसलीही घोषणाबाजी झाली नाही, असं म्हणत ओवैसी यांनी स्पष्टीकरण दिलं. प्रसारमाध्यमांमधून खोट्या बातम्या पसरवल्या जात असून मुस्लिमांचा द्वेष केला जात आहे, अशी टीकाही ओवैसी यांनी केली. ओवैसी यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतरही राजकीय नेत्यांकडून त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे. दरम्यान, अपक्ष खासदार नवनीत राणा (MP Navnit Rana) यांनी औवैसी यांना इशारा दिला आहे.

नवनीत राणा यांनी एक व्हिडिओ जारी करत ओवैसींना लक्ष्य केलं आहे. राणा म्हणाल्या, महाराष्ट्रात सध्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं सरकार नाही. त्यामुळे तुमच्या घोषणा आणि भडकाऊ भाषणं ऐकून घेतली जाणार नाहीत. ओवैसींनी आपल्या मर्यादेत राहावं. राज्यात औरंगजेबाच्या नावानं दिलेल्या घोषणा चालणार नाहीत, असा इशारा राणा यांनी ओवैसींना दिला आहे.

नेमकं काय म्हणाल्या नवनीत राणा?

मागील काही दिवसांपासून असदुद्दीन ओवैसी सातत्याने महाराष्ट्रात येत आहेत. ते कधी औरंगजेबाच्या नावनं घोषणा देतात, तर कधी व्यासपीठावर उभं राहून भडकाऊ भाषण देतात. पण ओवैसी यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी, आता महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचं सरकार नाही. जिथे तुमच्या घोषणा किंवा भडकाऊ भाषणं ऐकून घेतली जातील. त्यामुळे ओवैसी यांनी आपल्या मर्यादेत राहावं. ती मर्यादा पार करण्याचा प्रयत्न करु नये. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) विचार चालतात. येथे ओवैसींचे भडकाऊ भाषण आणि औरंगजेबाच्या घोषणा चालणार नाहीत, हे त्यांनी लक्षात ठेवावं आणि त्यानंतरच महाराष्ट्रात येण्याची हिंमत दाखवावी.

Web Title : MP Navnit Rana | MP navneet rana on aimim leader asaduddin owaisi aurangazeb slogan in buldhana rally

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा