MP Sanjay Raut | साहू प्रकरणावरून संजय राऊतांचा भाजपावरही भ्रष्टाचाराचा आरोप, नाव घेतल्याने प्रसाद लाड संतापले

नवी दिल्ली : MP Sanjay Raut | प्राप्तीकर विभागाने (Income Tax Department) केलेल्या छापेमारीत झारखंडचे काँग्रेस खासदार धीरज साहू (Congress MP Dheeraj Sahu) यांच्या घरावर छापेमारी करून आतापर्यंत ३५१ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. सध्या हे प्रकरण देशभरात गाजत असून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (PM Narendra Modi) ट्विट करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी साहू प्रकरणावरून भाजपा आमदार प्रसाद लाड (BJP MLA Prasad Lad) यांचा हजारो कोटींचा घोटाळा असल्याचे म्हटल्याने लाड संतप्त झाले आहेत.

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, काँग्रेस खासदाराकडे सापडलेल्या संपत्तीवर कायदेशीर कारवाई होईल. पण, केवळ काँग्रेस नेत्यांकडेच ही संपत्ती सापडते का. भाजपा नेत्यांकडे ईडी, सीबीआयचे अधिकारी का जात नाहीत. जर इंडिया आघाडीच्या (India Alliance) खासदाराकडे २०० कोटी आढळून आले असतील तर भाजपा नेत्यांकडे १ लाख कोटी रुपये काळे धन आढळून येईल.

संजय राऊत (MP Sanjay Raut) म्हणाले, भाजपा आमदार प्रसाद लाड यांचा हजारो कोटींचा घोटाळा आहे, शिवसेना
नेते आणि मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांचा १७८ कोटींचा घोटाळा आहे, राहुल कुल यांनीही घोटाळा केला आहे.
आम्ही ईडीकडे सतत तक्रार केल्या. त्यांच्यावर कारवाई करा ना.
ईडी आणि सीबीआय केवळ भाजपला संरक्षण देण्यासाठी बनवली नाही.

संजय राऊत यांनी आमदार प्रसाद लाड यांचे नाव घेतल्याने संतापलेल्या लाड यांनी संजय राऊत यांच्याविरुद्ध बदनामीचा खटला दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुण्यात दोन ठिकाणी घरफोडी, साडेचार लाखांचा ऐवज लंपास

पत्नीला भेटण्यासाठी सासरवाडीत आलेल्या जावयाला डोकं फुटेपर्यंत मारहाण, धनकवडी परिसरातील घटना

Manoj Jarange Patil | जरांगेंचा भुजबळ-पडळकरांना इशारा, ‘जीभेला आवर घाला’; फडणवीसांवर केला आरोप, ‘गोड बोलून डाव टाकायचे…’

Manoj Jarange Patil | अंतरवाली सराटीमधील लाठीचार्जवरून जरांगेंची जोरदार टीका, ”देवेंद्र फडणवीस काड्या करत राहिले तर…”

Bombay High Court | ‘लैंगिक हेतूशिवाय मुलीचा हात पकडल्यास विनयभंग नाही’, कोर्टाकडून आरोपीची निर्दोष सुटका