Manoj Jarange Patil | अंतरवाली सराटीमधील लाठीचार्जवरून जरांगेंची जोरदार टीका, ”देवेंद्र फडणवीस काड्या करत राहिले तर…”

नागपूर : Manoj Jarange Patil | अंतरवाली सराटीत मराठा आंदोलनात झालेला लाठीचार्ज हा बचावात्मक आणि वाजवी असल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हिवाळी अधिवेशनात (Maharashtra Winter Session) लेखी-प्रश्नोत्तरात सांगितले आहे. यावरून मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे.

जालना जिल्ह्यातील या आंदोलनात हिंसक जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत ७९ पोलीस अधिकारी आणि अंमलदार जखमी झाले आहेत. अंतरवाली सराटीत पोलिसांनी बचावात्मक पद्धतीने बळाचा वाजवी वापर केला. त्यात ५० आंदोलक जखमी झाले, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी लेखी प्रश्नाच्या उत्तरादाखल दिली आहे.

फडणवीस यांच्या या माहितीवरून जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी फडणवीसांना लक्ष्य केले आहे.
जरांगे म्हणाले, देवेंद्र फडणवीस काड्या करत राहिले, तर पुढे काय काय होते, ते पाहा. तुमचा डाव उधळून लावणार आहे.
तरच, मराठ्याचे असल्याचे सांगणार.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्यावर जरांगे यांनी टीका केल्याने आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी
जरांगेंना इशारा दिला आहे. राणे यांनी म्हटले फडणवीसांवर टीका कराल, तर आम्ही सहन करणार नाही.
फडणवीसांविरोधात भूमिका घेण्यास सुरूवात कराल, तर गाठ मराठ्यांशी आहे.

नितेश राणे यांना प्रत्युत्तर करताना जरांगे यांनी म्हटले की, मराठ्यांनी सावध राहावे.
कारण, देवेंद्र फडणवीसांचा मराठ्यांविषयी गरळ ओकण्याचा अंदाज दिसतोय. बरेचशे नेते आता जागे होत आहेत.
मराठ्यांनाच मराठ्यांविरोधात अंगावर घालण्याचे काम चालू आहे. पण, किती जणांना अंगावर घालणार हे मी पाहतो.
आम्ही शांत आहोत आणि राहु द्या.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

हडपसर परिसरात दहशत माजविणार्‍या गुंडावर एमपीडीए कारवाई; नागपूर कारागृहात केले स्थानबद्ध

पोलीस ठाण्यातच पोलिसांना शिवीगाळ करुन मारहाण, महिला पोलीस निरीक्षकांची कॉलर पकडून धमकावणी

कामगार नेते यशवंत भोसलेंना 16 लाखांचा गंडा, राष्ट्रीय श्रमिक संघटनेच्या खजिनदाराला अटक

सराईत गुन्हेगाराला समर्थ पोलिसांकडून अटक, पिस्टल जप्त

पुण्यात मराठी पाट्यांसाठी आंदोलन, मनसेच्या पदाधिकारी व कार्य़कर्त्यांवर डेक्कन, विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

महिलेचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला, ब्लॅकमेल करत केला बलात्कार; लष्करातील जवानावर FIR

नवले पुलाजावळ पुन्हा अपघात, कंटेनरची पाच वाहनांना धडक; चार जखमी (Video)

मौजमजेसाठी चोरीच्या दुचाकी विक्री करणारे एजंट कोंढवा पोलिसांकडून गजाआड, 15 दुचाकी जप्त