MP Sanjay Raut | ‘प्रश्न टिल्ल्या शरीरयष्टीचा नसून टिल्ल्या…’, संजय राऊतांचा राणेंना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MP Sanjay Raut | विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) यांच्याबद्दल केलेल्या विधानानंतर नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्विट करत खोचक शब्दात टीका केली होती. यांची श्रद्धा औरंगजेबावर आहे, हे केव्हाच सिद्ध झालं आहे असे राणे म्हणाले होते. यावर अजित पवार यांना विचारले असता, टिल्ल्या लोकांवर बोलायची गरज नाही, त्यांना आमचे प्रवक्ते उत्तर देतील असे सांगितले. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी देखील राणेंवर टीका केली.

 

मी त्याला पूर्ण नागडा करेन

संजय राऊत (MP Sanjay Raut) म्हणाले, अजित पवारांनी फार समर्पक अशी उपमा दिली आहे. यांची (राणे) बुद्धी तेवढीच आहे टिल्ली. हा प्रश्न टिल्ल्या शरीरयष्टीचा नसून टिल्ल्या बुद्धीचा आहे. मी अशाप्रकारची भाषा कधी वापरत नाही. पण आता वापरली आहे. याला जबाबदार सर्वस्वी नारायण राणे (Narayan Rane) हा माणूस आहे आणि यापुढे जर तो बोलत राहिला, तर मी त्याला पूर्ण नागडा करेन. ये तुझी पोरं येताय तर पोरांना येऊ दे, तू येतोस तर तू ये. ये मैदानात, केंद्राची सुरक्षा घेऊन फिरतोय, हिंमत आहे तर एकटा फिर, स्वत:ला मोठा भाई समजतोस, अशा शब्दात राऊतांनी राणेंवर हल्लाबोल केला.

 

राणे माझ्या नादाला लागू नकोस

कोणत्या अग्रलेखाबद्दल म्हणताय तुम्ही? वाचा नीट. परत सांगतो नारायण राणे माझ्या नादाला लागू नकोस. आता मी कालपर्यंत गप्प होतो आज तू मर्यादा सोडली आहेस. तुझ्यासारखे आले 56 आणि गेले. नामर्द माणूस आहेस तू ईडी (ED) आणि सीबीआयच्या (CBI) भीतीने पळून गेलास. तू आम्हाला लढायच्या गोष्टी काय सांगतोस. तुझी लायकी आहे का? अशा शब्दात संजय राऊतांनी नारायण राणेंवर प्रहार केला.

 

 

 

Web Title :- MP Sanjay Raut | sanjay raut targets narayan rane over ajit pawars criticism of nitesh rane

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा