MP Sanjay Raut | ‘नारायण राणे माझ्या नादाला लागू नकोस, तुझ्यासारखे…’, नारायण राणेंचा एकेरी उल्लेख करत संजय राऊतांचा घणाघात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सामनातील अग्रलेखावरुन नारायण राणे (Narayan Rane) यांनी संजय राऊतांना (MP Sanjay Raut) इशारा दिला होता. त्यानंतर संजय राऊतांनीही (MP Sanjay Raut) राणेंविरोधात आक्रमक भूमिका घेत प्रसारमाध्यांना प्रतिक्रिया देताना थेट एकेरी भाषेत त्यांना प्रत्युत्तर दिले. त्यामुळे आता संजय राऊत आणि नारायण राणे यांच्यातील वाद टोकाला जाण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.

तो पादरा पावटा

संजय राऊत (Narayan Rane) म्हणाले, पादरा पावटा आहे तो बाळासाहेबांच्या भाषेत, पादरा माणूस आहे. आतापर्यंत मी त्याच्याबद्दल काही बोललो नाही, हा सगळ्यांना अरे तुरे करतो हा कोण आहे? मुख्यमंत्र्यांना अरे तुरे, कालपर्यंत एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना अरे तुरे करत होता. जुने व्हिडिओ काढा त्यात मोदींनाही (Narendra Modi) अरे तुरे. हे कोण आहेत. यांची चौकशी करा. आता मी करणार, आता मी काढतो, असा इशारा राऊत यांनी यावेळी दिला.

डरपोक लोक आहात तुम्ही

संजय राऊत पुढे म्हणाले, कालपर्यंत मी संयमाने वागलो. पण तुम्ही जर रोज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अशोक चव्हाण (Ashok Chavan), सोनिया गांधी (Sonia Gandhi), मोदी या संगळ्यांवरती अरे तुरे, अरे तुरे कोण तुम्ही? डरपोक लोक आहात तुम्ही. तुम्ही पळून गेलात तुमच्या किरीट सोमय्यांनी तुमच्यावर जे आरोप केलेत, त्यावर उत्तर दिलं का तुम्ही? कुठंय किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आता? असं राऊत म्हणाले.

राणे माझ्या नादाला लागू नकोस

कोणत्या अग्रलेखाबद्दल म्हणताय तुम्ही? वाचा नीट. परत सांगतो नारायण राणे माझ्या नादाला लागू नकोस.
झालं आता मी कालपर्यंत गप्प होतो आज तू मर्यादा सोडली आहेस. तुझ्यासारखे आले 56 आणि गेले.
नामर्द माणूस आहेस तू ईडी (ED) आणि सीबीआयच्या (CBI) भीतीने पळून गेलास.
तू आम्हाला लढायच्या गोष्टी काय सांगतोस. तुझी लायकी आहे का? अशा शब्दात संजय राऊतांनी नारायण राणेंवर प्रहार केला.

Web Title :- MP Sanjay Raut | shivsena leader sanjay rauts response to bjp leader narayan rane criticism

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | नाशिक पाठोपाठ ठाकरे गटाला परभणीत मोठा धक्का! एवढ्या नगरसेवकांनी केला शिंदे गटात प्रवेश

Girish Mahajan | ‘त्या’ विधानाबाबत गिरीश महाजन यांनी मागितली माफी, म्हणाले- ‘तो उल्लेख अनावधानाने झाला’