MP Srinivas Patil | शरद पवार हे नास्तिक नाहीत, खासदार श्रीनिवास पाटलांकडून आरोपांचं खंडन

ADV

आळंदी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) हे नास्तिक असल्याचे म्हटले जाते. याचं खासदार श्रीनिवास पाटील (MP Srinivas Patil) यांनी खंडन केलं आहे. आळंदीमध्ये भागवत वारकरी संमेलन (Bhagwat Varkari Samelan) आयोजित केले आहे. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह खासदार श्रीनिवास पाटील (MP Srinivas Patil), डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) उपस्थित होते.

श्रीनिवास पाटील म्हणाले, मी नेवासा येथील मंदिरावर गुलाबाच्या पाकळ्या टाकण्यास सांगितले होते. पवार साहेबांनी फोन करुन सांगितले मी गुलाबाच्या पाकळ्या देहूतही टाकल्या आहेत. शरद पवार यांना नास्तिक म्हटले जाते, याचं खंडन श्रीनिवास पाटील यांनी वारकऱ्यांसमोर केलं.

शरद पवार हे नास्तिक असल्याची नेहमीच चर्चा रंगते. मात्र, ते वारंवार आळंदी असेल किंवा देहू असेल या ठिकाणी जाऊन वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमांना हजेरी लावत असतात.
अनेक वेळा वारकऱ्यांच्या कार्यक्रमात भजन कीर्तनात ते तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले.
आज देखील शरद पवार संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या (Saint Dnyaneshwar Maharaj)
संजीवन समाधीच्या स्थळी नतमस्तक झाले.
देवस्थान यांच्याकडून तुळशीहार आणि ज्ञानोबांची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यापूर्वी देखील देहूत तुकोबांच्या चरणी ते नतमस्तक झाल्याच सर्वांनी बघितलं आहे.
तरी देखील त्यांना वारंवार नास्तिक म्हटलं जातं,
परंतु ते नास्तिक नाहीत असं म्हणत श्रीनिवास पाटील (MP Srinivas Patil) यांनी आरोपांचं खंडन केलं.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune-Daund Railway Block | तांत्रिक कामांसाठी पुणे-दौंड मार्गावर रेल्वेचा ब्लॉक, पुढील दोन दिवस अनेक गाड्या रद्द