Pune-Daund Railway Block | तांत्रिक कामांसाठी पुणे-दौंड मार्गावर रेल्वेचा ब्लॉक, पुढील दोन दिवस अनेक गाड्या रद्द

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune-Daund Railway Block | पुणे-दौंड रेल्वे मार्गावरील पाटस स्थानकावर (Patus Railway Station) ब्लॉक घेऊन विविध तांत्रिक कामे केली जाणार आहेत. या कामांमुळे 3 ऑक्टोबरला काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या सुटण्याची व पोहोचण्याची ठिकाणे बदलण्यात आली आहेत, असे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने (Pune Division of Central Railway) कळविले आहे. (Pune-Daund Railway Block)

या ब्लॉकमुळे पुणे-सोलापूर-पुणे एक्सप्रेस (Pune-Solapur-Pune Express), पुणे-बारामती पॅसेंजर (Pune-Baramati Passenger), पुणे-दौंड पॅसेंजर (Pune-Daund Passenger), बारामती-दौंड पॅसेंजर (Baramati-Daund Passenger), दौंड-पुणे पॅसेंजर (Daund-Pune Passenger) आणि दौंड-हडपसर पॅसेंजर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांचे सुटण्याची आणि पोहचण्याची ठिकाणे बदलण्यात आली आहे. यामध्ये 2 ऑक्टोबरला इंदूरहून सुटणारी इंदूर-दौंड एक्सप्रेस ही गाडी पुण्यापर्यंत धावेल. तसेच 3 ऑक्टोबरला दौंडवरुन सुटणारी दौंड-इंदूर एक्सप्रेस ही गाडी पुण्यातून सुटेल. हैदराबाद येथून सुटणारी हैदराबाद-हडपसर एक्सप्रेस ही गाडी 2 ऑक्टोबरला दौंड पर्यंत धावेल. तर 3 ऑक्टोबरला हडपसर वरून सुटणारी हडपसर-हैदराबाद एक्सप्रेस ही गाडी दौंड येथून सुटेल. (Pune-Daund Railway Block)

या गाड्या रद्द

सोलापूर-पुणे डेमू गाडी (Solapur-Pune DEMU Train) 2 ऑक्टोबरला दौंड-पुणे दरम्यान रद्द केली आहे. बारामती-पुणे पॅसेंजर 3 ऑक्टोबरला दौंड-पुणे दरम्यान रद्द करण्यात आली आहे. पुणे-बारामती पॅसेंजर 3 ऑक्टोबरला पुणे-दौंड दरम्यान रद्द राहील. हडपसर-सोलापूर डेमू गाडी 3 ऑक्टोबरला हडपसर-दौंड दरम्यान रद्द राहील.

उशिराने धावणाऱ्या गाड्या

ब्लॉकच्या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-बंगळुरू उद्यान एक्सप्रेस (CSMT Mumbai-Bangalore Udyan Express),
नागरकोईल-मुंबई (Nagercoil-Mumbai), बंगळुरू-मुंबई उद्यान (Bangalore-Mumbai Udyan),
जम्मूतावी-पुणे झेलम (Jammu Tawi-Pune Jhelum), अमरावती-पुणे आणि
कराईकल-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (Karaikal-Lokmanya Tilak Terminus Express) उशिराने धावतील.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Chief Sharad Pawar | शरद पवारांचे सूचक विधान, म्हणाले-‘राष्ट्रवादीचा संस्थापक कोण आहे ते…’