MP Sujay Vikhe Patil | भाजपा खासदार सुजय विखेंच्या वक्तव्याची चर्चा, ”दोन महिने होऊ द्या, नंतर मी कायमचा इकडेच येईन”

शिर्डी : MP Sujay Vikhe Patil | आमच्यावर झालेल्या प्रत्येक आरोपांना मी दोन महिन्यांनी उत्तरे देईन. सध्या लोकसभेची व्यस्तता आहे. शिर्डी मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने मी खासदार झालो आहे. मात्र खासदार करून तुम्हीच मला लांब लोटले. माझे दोन महिने होऊ द्या. नंतर मी कायमचा इकडे येईन. काळजी करू नका, असे वक्तव्य भाजपा खासदार सुजय विखे पाटील यांनी केले आहे. त्यांचे हे वक्तव्य राजकी वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. ते राहाता, शिर्डी येथील कार्यक्रमात बोलत होते.

सुजय विखे यांना आगामी लोकसभा निवडणुकीचे तिकिट मिळणार नाही, अशा चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशावेळ त्यांनी केलेले हे वक्तव्य चर्चेत आले आहे.

कार्यकर्त्यांना सुनावताना सुजय विखे म्हणाले, जनतेची कामे जे करतील अशा कार्यकर्त्यांच्या हस्तेच मी सत्कार स्वीकारेन. मला हार तुरे आणणारे नको, तर जनतेची कामे करणारे कार्यकर्ते हवेत. आपल्यावर होणाऱ्या प्रत्येक आरोपांचे उत्तर जनतेची कामे करून द्या.

ते पुढे म्हणाले, आपल्यावर नेहमीच आरोप होतात. आपल्या विरोधात कुणी कितीही मोर्चे काढू द्या. विखे पाटलांना शिव्या देणाऱ्यांचा निषेध करत विरोधकांचा अपमान करणारा आमचा सच्चा कार्यकर्ता नाही. कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांची ही शिकवण नाही, असे सुजय विखे म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

अनंत अंबानी-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये सलमान-शाहरुख -आमिरचा एकत्र डान्स, बॉलीवूडचे तीन खान थिरकले! (Video)