MP Supriya Sule | लखीमपूरच्या घटनेवरून खा. सुप्रिया सुळेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ‘घणाघात’, म्हणाल्या… (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  MP Supriya Sule | राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी कालच लखीमपूर (lakhimpur kheri) प्रकरणी आपली भूमिका मांडली आहे. लोक शांततेत आंदोलन करत होते, अशावेळी झालेला हल्ला हा योगी सरकारकडून (Yogi Government) झाला आहे. आपली मागणी पूर्ण झाली नसल्याने शेतकरी आंदोलन करत आहेत. कोणत्याही महिलेवर तसेच शेतकऱ्यांवर अन्याय होणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) सहन करणार नाही, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी दिला आहे.

सुळे यांनी आज महात्मा जोतिबा फुले यांनी स्थापन केलेली मुलींची पहिली शाळा भिडेवाड्याला भेट देऊन पाहणी केली, यावेळी बोलताना लखीमपूरच्या (lakhimpur kheri) घटनेविषयी विचारलं असता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर देखील टीका केली आहे.
बलात्कार (Rape) असो की शेतकऱ्यांवरचा हल्ला (Attack on Farmer), पंतप्रधान कधीच आशा गोष्टीवर बोलत नसल्याचं त्या म्हणाल्या.

दरम्यान, मागील आठवड्यात महात्मा फुले यांच्या पुरंदर तालुक्यातील खानवडी या मूळगावी भेट दिली. तेव्हा तेथील ग्रामस्थांसोबत चर्चा करून त्या ठिकाणी शिक्षणाच्या दृष्टीने काय करता येईल याबाबत चर्चा देखील केली आहे.
तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दोन आठवड्या पूर्वीच खानवडी येथे मुलींची भव्य अशी शाळा उभारली जाणार आहे.
त्याच पार्श्वभूमीवर भिडेवाडा येथे भेट दिल्याचं सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी सांगितले.

 

सातारा, खानवडी आणि पुणे या तीन ठिकाणावरील इतिहास पुढील पिढीला माहिती होण्याच्या दृष्टीने विशेष काम केले जाणार आहे.
त्यामध्ये प्रामुख्याने सातारा येथील नायगाव हे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच गाव, तर खानवडी हे महात्मा फुले यांच गाव आणि पुणे येथे मुलींच्या शिक्षणासाठी
करण्यात आलेले कार्य पुढील पिढीला माहिती व्हावा, यासाठी विशेष काम केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar), राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे (ankush kakade), शहराध्यक्ष प्रशांत जगताप
(ncp city president prashant jagtap), महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ (PMC deepali dhumal), माजी उप महापौर आणि विद्यमान नगरसेवक दिपक मानकर
(Deepak Mankar), नगरसेवक विशाल तांबे (Vishal Tambe), रवींद्र माळवदकर (ravindra malvadkar), दत्ता सागरे (datta sagare) आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Web Title : MP Supriya Sule | MP Supriya Sule on Lakhimpur incident and PM Narendra Modi, says … (Video)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

SMS Email Alert | तुम्हाला सुद्धा आला असेल ‘हा’ SMS किंवा ई-मेल तर व्हा सावध; अन्यथा बुडतील तुमचे सर्व पैसे; जाणून घ्या

Gravity Foundation | ग्रॅव्हिटी फाउंडेशनचा उपक्रम ! देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली बाल्हेगाव विकास योजनेचे उद्घाटन

PM Kisan | शेतकर्‍यांसाठी मोठी खुशखबर ! ‘या’ दिवशी येतील 10व्या हप्त्याचे पैसे, ‘या’ शेतकर्‍यांना मिळतील 4000 रुपये