PM Kisan | शेतकर्‍यांसाठी मोठी खुशखबर ! ‘या’ दिवशी येतील 10व्या हप्त्याचे पैसे, ‘या’ शेतकर्‍यांना मिळतील 4000 रुपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शेतकर्‍यांसाठी (Farmers) मोठी खुशखबर येत आहे. जर तुम्ही सुद्धा पीएम किसान (PM Kisan Samman Nidhi Yojana) योजनेचे लाभार्थी आहात तर तुम्हाला लवकरच खुशबर मिळू शकते. मीडिया रिपोर्टनुसार, पीएम किसान योजनेंतर्गत 10वा हप्ता जारी (PM Kisan 10th installment) करण्याची तारीख ठरली आहे. हप्ता ट्रान्सफर करण्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे.

आतापर्यंत, केंद्राने भारतात 11.37 कोटी शेतकर्‍यांना 1.58 लाख कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. केंद्र सरकार 15 डिसेंबर 2021 पर्यंत प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा 10वा हप्ता जारी करण्याची तयारी करत आहे. सरकारने मागील वर्षी 25 डिसेंबर 2020 ला शेतकर्‍यांना पैसे ट्रान्सफर केले होते.

या शेतकर्‍यांच्या खात्यात येतील 4 हजार रुपये
ज्या शेतकर्‍यांना पीएम किसानचा शेवटचा हप्ता मिळालेला नाही, त्यांना आता पुढील हप्त्यासह मागील रक्कम सुद्धा मिळेल. म्हणजे त्या शेतकर्‍यांना रु. 4000 दिले जातील. मात्र, ही सुविधा त्यांनाच मिळू शकते ज्यांनी 30 सप्टेंबरपूर्वी रजिस्ट्रेशन केले असेल. आता जर तुमचा अर्ज स्वीकारला गेला तर तुम्हाला ऑक्टोबरमध्ये 2000 आणि आणखी हप्ता डिसेंबरमध्ये मिळेल.

6000 रुपये वार्षिक देते सरकार
शेतकर्‍यांना केंद्र सरकार पीएम किसान सम्मान निधी योजनेंतर्गत (PM kisan Samman Nidhi Scheme) शेतकर्‍यांना दरवर्षी 6000 रुपये देते. या योजनेत रजिस्ट्रेशन करणे सोपे आहे. घरबसल्या ऑनलाइन ही प्रोसेस पूर्ण करता येते. तसेच ग्रामसेवक किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे या योजनेसाठी अप्लाय करू शकता.

 

पात्र शेतकरी अशाप्रकारे करू शकतात रजिस्ट्रेशन

सर्वप्रथम PM Kisan ची अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर व्हिजिट करा.

यानंतर Farmers Corner नावाचे एक ऑपशन दिसेल.

नंतर याच्या खाली New Farmer Registration चे ऑपशन दिसेल. त्यावर क्लिक करा.

यानंतर नवीन पेज ओपन होईल. ज्यामध्ये Aadhaar number आणि Captcha भरा.

नंतर काही वैयक्तिक माहिती भरावी लागेल.

आधारशिवाय रजिस्ट्रेशन होणार नाही.

Web Title :- PM Kisan | pm kisan beneficiaries will get 10th installment farmers can earn 4000 rupees check details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

LPG Gas Cylinder | आज जाहीर झाले ऑक्टोबर महिन्यासाठी LPG स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे नवीन दर; दरात 15 रुपयांची वाढ

Fingernails | नखांचा रंग पाहून ओळखा आरोग्याची स्थिती, ‘हे’ 8 आजार जाळ्यात ओढू शकतात; जाणून घ्या कसे ओळखावे

Kirit Somaiya | किरीट सोमय्या बारामती दौऱ्यात कोणता गौप्यस्फोट करणार?, चर्चांना उधाण