MP Udayanraje Bhosale | ‘हात जोडून विनंती करतो, बँकेच्या सभासदांची जिरवू नका, माझी जिरवायची असेल तर जिरवा’ (व्हिडीओ)

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन –  MP Udayanraje Bhosale | सभासदांची जिरवू नका माझी जिरवायची असेल तर जिरवा. अशी संतप्त प्रतिक्रिया राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी शनिवारी दिली आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने (Satara District central co operative bank) जरंडेश्वर साखर कारखान्याला दिलेल्या कर्जवाटप प्रकरणी बँकेला ED ची नोटीस आली. या नोटीसबाबत खा. उदयनराजे यांनी बँकेकडे माहिती मागत विचारणा केली. पण, बँकेच्या संचालकांनी ही माहिती देण्यास नकार दिला. यानंतर उदयनराजे हे चांगलेच संतापले.

 

हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला या संदर्भात माहिती देऊ शकत नाही.
असं बँकेच्या संचालक मंडळाने उदयनराजे यांना सांगितले.
त्यावर उदयनराजेंनी (MP Udayanraje Bhosale) संतप्त प्रतिक्रिया दिली.
त्यावेळी बोलताना उदयनराजे म्हणाले की, बँक ही टिकून रहावी असं मला वाटत आहे.
मला माहिती आहे की, मी बोलत असताना अनेकांना वाटत असेल की खूप मस्ती आलीय.
माझी नका जिरवू, मेहरबानी करा, माझी विनंती आहे, मी तुमचा कोणाचा दुश्मन नाहीये.
हात जोडून विनंती करतो. ही बँक शेतकरी आणि शेतकरी सभासदांची आहे. या गोरगरीब शेतकरी सभासदांच्या वतीने विनंती करतो ही बँक राहू द्या.
ही बँक शेतकऱ्यांची अर्थवाहिनी आहे. सभासदांची जिरवू नका माझी जिरवायची असेल तर जिरवा. असं उदयनराजे म्हणाले.

पुढे बोलताना उदयनराजे म्हणाले की, मी जे हे काही करतोय त्यात माझा स्वार्थ काय आहे ? ते कोण मला पॅनलमध्ये घेणारे, मी ठरवतो कुठं जायचं.
परिणामांना मी घाबरत नाही, जे व्हायचंय ते होऊ द्या. हे सर्व करत असताना माझा स्वार्थ काय आहे ते सांगा. मी कोणाच्या विरोधात बोलत नाही.
मी शेतकऱ्यांच्या हिताचं बोलतोय असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : MP Udayanraje Bhosale | MP udayanraje bhosale angry over satara district bank denied to give him information about ed notice to bank

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Chandrakant Patil | ‘मला आमदारकी नितीन गडकरींमुळे मिळाली, सरकार असताना जे मिळालं ते अमित शाहांमुळं’

MLA Gopichand Padalkar | एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरून आमदार गोपीचंद पडळकर आक्रमक; आटपाडी डेपोला लावलं कुलुप

Life Certificate | तुमची पेन्शन SBI मध्ये येते का? घरबसल्या व्हिडिओ कॉलद्वारे जमा करा जीवन प्रमाणपत्र, स्टेप बाय स्टेप जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया