MP Vinayak Raut | ‘ज्या-ज्या पक्षाने मोठं केलं, त्यांना…’, ठाकरेंना आत्मपरीक्षणाचा सल्ला देणाऱ्या दीपक केसरकरांवर विनायक राऊतांचे टीकास्त्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण केले तर शिवसेना (Shivsena) एकसंघ होण्यास वेळ लागणार नाही, असे वक्तव्य शिंदे गटाचे (Shinde Group) मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केले होते. या वक्तव्यावरुन ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी केसरकर यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. काल परवापर्यंत ओठ सुद्धा न उघडणारे दीपक केसरकर खूप पोपटपंची करत असून जाणकार वृत्तीप्रमाणे ते उद्धव ठाकरेंना आत्मपरिषणाचा सल्ला देत आहेत, अशी टीका विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी केली.

काय म्हणाले होते केसरकर?

ज्यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांसाठी लढा लढवला, ते सहजासहजी सोडून जात नाहीत. निश्चितपणे काहीतरी घडलेलं आहे, ज्यामुळे आमदार बाहेर पडले. नेमकं काय घडलं होते, त्याचं उद्धव ठाकरेंनी आत्मपरिक्षण केलं पाहिजे. उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण केले, तर शिवसेना एकसंघ होण्यास वेळ लागणार नाही, असं दीपक केसरकर म्हणाले होते.

ज्या-ज्या पक्षांने मोठं केलं त्यांना…

उद्धव ठाकरे यांना आत्मपरीक्षणाचा सल्ला देणाऱ्या दीपक केसरकर यांच्यावर टीका करताना विनायक राऊत
(MP Vinayak Raut) म्हणाले, काल परवापर्यंत ओठ सुद्धा न उघडणारे केसरकर खूप पोपटपंची करत आहेत.
अत्यंत जाणकार वृत्तीप्रमाणे उद्धव ठाकरेंना आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला देण्याचा आगावपणा केसरकरांनी केला.
पण ज्या-ज्या पक्षाने मोठं केलं, त्यांना फसवण्याचा धंदा तुम्ही केला, अशा शब्दात विनायक राऊत यांनी केसरकरांवर टीकास्त्र सोडलं.

Web Title :- MP Vinayak Raut | vinayak raut attacks deepak kesarkar over uddhav thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrakant Patil – Ashok Saraf | अभिनेते अशोक सराफ यांच्या कारकीर्दीची 50 वर्षे ! ‘अशोक पर्व’ या  कार्यक्रमाचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन

Mumbai Crime | ‘ते’ फोटो व्हायरल करण्याची डॉक्टर तरुणीला धमकी, बीएमसीच्या MBBS डॉक्टरला अटक