MPSC Students Protest in Pune | पुण्यात MPSCचे विद्यार्थी आक्रमक; आंदोलन करत केल्या ‘या’ मागण्या

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन – एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी सोमवारी पुण्यात आंदोलन (MPSC Students Protest in Pune) केलं. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission) परीक्षेच्या अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय घेतला होता. येणाऱ्या नवीन वर्षात म्हणजे 2023 मध्ये आयोगाचा संपूर्ण अभ्यासक्रम बदलून नवीन अभ्यासक्रम (New Syllabus) लागू करण्यात येणार आहे. मात्र यावर कित्येक वर्षांपासून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार केला गेला नाही. अचानक अभ्यासक्रम बदलल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळणार नाही आणि कित्येक वर्षांची मेहनत वाया जाऊ शकते, असे विद्यार्थ्यांचे मत आहे.

सध्याचा अभ्यासक्रम न बदलता नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्यात यावा,
अशी मागणी विद्यार्थ्यांनी यावेळी केली. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून आयोगाच्या परीक्षेत देखील गैरप्रकार होत आहेत.
उत्तर पत्रिकेत घोळ आणि प्रश्नपत्रिकेत चुका यामुळे परीक्षार्थी त्रस्त आहेत.
अशा प्रकारांवर रोख लावण्यासाठी सुद्धा आयोगाने लक्ष घालण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली.

आयोगाच्या विरोधात आंदोलन केले, तर विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई करू, अशा आशयाचे ट्वीट आयोगाने
नुकतेच प्रसारीत केले आहे, असे विद्यार्थ्यांचे मत आहेत.
आम्ही त्याचा तीव्र विरोध करत असल्याचे देखील विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.
आयोग विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला तयार नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

Web Title :- MPSC Students Protest in Pune | mpsc students protest in pune to avoid new syllabus in 2023 and other seeking

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nora Fatehi | फिफा वर्ल्ड कपमधील नोरा फतेहीचा ‘तो’ डान्स व्हिडिओ वायरल

Pune Crime | पुण्यात रात्रगस्तीवर असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी, पुण्यातील घोरपडे पेठेतील घटना

Hemant Godse | ‘एक मच्छर आदमी को…’ हेमंत गोडसेंचे संजय राऊतांना जशास तसे उत्तर