Mrunal Thakur | अभिनेत्री मृणाल ठाकूर झाली एअरपोर्टवर देसी लूकमध्ये स्पॉट; फोटो व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन – मनोरंजन विश्वामध्ये लोकप्रिय असणारी अभिनेत्री मृणाल ठाकुर (Mrunal Thakur) हिचा मोठा चाहता वर्ग आहे. मृणालने तिच्या अभिनयाच्या बळावर छोट्या पडद्यावरील मालिका ते बिग बजेट चित्रपटांपर्यंत प्रवास पार केला आहे. अनेक मालिकांमध्ये व चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या मृणालने आपल्या प्रभावी अभिनयाची छाप तिच्या प्रत्येक कामामध्ये उमटवली आहे. मृणाल (Mrunal Thakur) तिच्या चित्रपटांबरोबरच तिच्या फॅशनसाठी देखील नावाजली जाते. नेहमी हटके लूक करणाऱ्या अभिनेत्री मृणाल ठाकुर हिचा एअरपोर्ट लूक (Mrunal Thakur Airport Look) सध्या व्हायरल होत आहे. यावेळी मृणालने केलेला देसी एअरपोर्ट लूक नेटकऱ्यांना आवडला आहे.

अभिनेत्री मृणाल ठाकुर ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असून तिच्या लाईफ अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. पापाराझी (Bollywood Paparazzi) देखील तिच्या मागे फोटोंसाठी लागलेले असतात. यावेळी देखील पापाराझींनी अभिनेत्री मृणाल ठाकुर हिला मुंबई एअरपोर्टवर स्पॉट केले. तिचा हटके एअरपोर्ट लूक पाहून चाहते अवाक झाले आहे. यावेळी तिने देसी लूक केला असून पिंक कलरचा सूट परिधान केला. सोबत पूर्ण ओढणी घेऊन तिने ब्लॅक कलरचा गॉगल देखील घातला होता. तिने ब्लॅक कलरची बॅग व त्याच रंगाचे शूज देखील स्टाईल केले होते. अभिनेत्री मृणाल ठाकूर हिचा स्पेशल एअरपोर्ट लूक सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Advt.

बॉलीवुडच्या अभिनेत्रींच्या (Bollywood actress) एअरपोर्ट लूकच्या नेहमी चर्चा असतात. मागील काही दिवसांपासून अनेक अभिनेत्री देसी स्टाईलने लूक कॅरी करत असलेले दिसून आले आहे. यामध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma), सारा अली खान (Sara Ali Khan), जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) या अभिनेत्री ड्रेस सूटमध्ये एअरपोर्टवर झळकल्या होत्या, आता यामध्ये अभिनेत्री मृणाल ठाकुर (Mrunal Thakur) हिचे नाव दाखल झाले आहे. मृणालचा सिता रामण (Sita Ramam), जर्सी (Jersey), गुमराह (Gumraah), सुपर 30 (Super 30), लस्ट स्टोरीज् 2 (Lust Stories 2) असे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले आहेत. तिने विट्टी दांडू (Vitti Dandu) या 2014 साली प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांमधून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aaditya Thackeray | उदय सामंतांच्या ‘त्या’ आरोपांवर आदित्य ठाकरेंचा पलटवार; म्हणाले “दसरा मेळाव्यासाठी 10 कोटी…”

Mumbai Pune Expressway | मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर दोन तासांचा ब्लॉक; मुंबईवरून पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद राहणार