निवृत्‍तीनंतर महेंद्रसिंह धोनी लष्करात ‘भर्ती’ ?, ‘माही’च्या जवळच्या मित्राचा ‘गौप्यस्फोट’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विश्वचषकातून भारतीय संघ बाहेर पडल्यानंतर अनेक गोष्टींच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. अधीक चर्चेचा विषय म्हणजे एक की भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याच्या निवृत्तीची चर्चा होती. तो काय करणार आहे, असे अनेक प्रश्न त्याला केले जात होते. त्यात आता धोनीच्या जवळच्या मित्राने यावर काही खुलासा केला आहे. धोनीला देशसेवा करण्याची इच्छा आहे, असं धोनीच्या मित्राने सांगितलं आहे.

Image result for dhoni nice pic

धोनी निवृत्तीनंतर सैन्यात दाखल होण्याची शक्यता आहे. सैन्यात आव्हानात्मक पोस्टिंग मिळावी, अशी धोनीची इच्छा असल्याचे धोनीच्या मित्राने सांगितलं आहे. तसंच सैन्यात गेल्यावर सियाचीन सारख्या कठीण ठिकाणी पोस्टिंग मिळवून देशसेवा करायला आवडेल, असंही त्याने सांगितलं आहे.

Image result for dhoni batting

पुढील काही महिन्यात सियाचीनमध्ये पोस्टिंग मागू शकतो. धोनी स्वत: सैन्यातील अधिकाऱ्यांना त्याची इच्छा कळवणार आहे, असंही त्याच्या मित्राने सांगितलं. भारतीय सैनिक ज्याप्रकारे देशसेवा करतात, तशी देशसेवा धोनीला करायची आहे. धोनी लवकरच या सर्व विषयांवर बोलण्यासाठी सैन्याशी संपर्क साधू शकतो, असंही त्याने सांगितलं आहे. तसेच धोनीच्या डोक्यात यावेळी नेमकं काय चालले असावे हे कोणीत नीट सांगू शकत नाही, असेही सुचक वक्तव्य त्याने यावेळी केला.

Image result for dhoni family

दरम्यान, विश्वचषकातील धोनीच्या खेळीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह केले. धोनीने विश्वचषकातील ८ सामन्यात २७३ धावा केल्या. त्यातील अनेक सामन्यात संथ खेळी केली. त्यामुळे त्याच्यावर टीका करण्यात आली. आणि त्याला निवृत्तीचा सल्लाही देण्यात आला. धोनीच्या चाहत्यांनी त्यांन निवृत्ती घेऊ नये असंच म्हटलं आहे. धोनीची भारतीय संघाला गरज आहे. त्याच्यासारखा खेळाडू पुन्हा भारताला मिळणे अशक्य आहे. त्यामुळे त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ नये अशीच त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे. मात्र धोनी निवृत्तीबाबत नेमका कोणता निर्णय घेणार हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

Image result for dhoni army

 गोरी त्वचा हवी असेल तर करा हे घरगुती उपाय

‘परफेक्ट’ लिपस्टिक लावण्यासाठी काही खास टिप्स – जाणून घ्या

हृदयाच्या रक्तवाहिनी च्या आजारामुळे होतात छातीत वेदना

आरोग्यदायी जीवनासाठी नियमित दूध घ्यायलाच हवे

चांगल्या आरोग्यासाठी जीम मध्ये जाण्यास वेळ नसेल तर ‘हे’ करा

सावधान ! समुद्रात आंघोळ करणार असाल तर हे तुमच्यासाठीच आहे, जरूर वाचा

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like