राज्यात सरकारी नोकरीची ‘सुवर्ण’संधी ! MSSC मध्ये 7000 जागांवर भरती, जाणून घ्या प्रक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात (Maharashtra State Security Corporation) पुरुष सुरक्षा रक्षक पदांच्या 7000 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे, यासाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 मार्च 2020 असणार आहे.

पद आणि पदसंख्या –
पुरुष सुरक्षा रक्षक – 7000 जागा

अर्ज करण्याची अंतिम तारीख –
उमेदवारांना अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 मार्च 2020 पर्यंत देण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता –
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 12 पास असणे आवश्यक आहे.

वयाची अट –
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 28 वर्षांदरम्यान असावे, उमेदवारांचा जन्म 31 जानेवारी 1992 ते 31 जानेवारी 2002 दरम्यानचा असावा.

शुल्क –
अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शुल्क म्हणून 250 रुपये भरावे लागतील.

वेतनमान –
निवड झालेल्या उमेदवारांना वेतन म्हणून 17,000 रुपयांपेक्षा अधिक पगार देण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण –
परिक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही नोकरीची संधी मिळेल.

अर्ज प्रक्रिया –
अर्ज ऑनलाइन करायचा असून त्यापूर्वी उमेदवारांनी http://www.mahasecurity.gov.in/images/msf/pdf/Website25022020.pdf या लिंकवर जाऊन परिक्षेचे नोटीफिकेशन वाचून घ्यावे, त्यानंतर अर्ज करावा.

उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी http://www.mahasecurity.gov.in/applicationform.php या वेबसाइटवर जावे. या वेबसाइटवरुन उमेदवार आपला अर्ज ऑनलाइन दाखल करु शकतात.