Mugdha Godse | करोडो रुपयांची मालकीण कमावत होती दिवसाला फक्त 100 रुपये; अभिनेत्री मुग्धा गोडसेचा प्रेरणादायी प्रवास

पोलीसनामा ऑनलाइन – फॅशन चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री मुग्धा गोडसे (Mugdha Godse) ही बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मुग्धाने अगदी संघर्षातून तिचा प्रवास सुरु केला. मॉडेलिंग क्षेत्रानंतर ती बॉलीवुडकडे वळाली आणि आज मुग्धाचा (Mugdha Godse) मोठा चाहता वर्ग असून अनेक भूमिका तिने उत्कृष्टरित्या निभावल्या आहेत. पुण्यात जन्मलेली अभिनेत्री मुग्धा गोडसे हिचा आज वाढदिवस (Mugdha Godse Birthday) आहे. या निमित्ताने तिचा संघर्षमय व प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊया.

अभिनेत्री मुग्धा गोडसे हिचा जन्म पुण्यात 26 जुलै 1986 रोजी झाला. आपल्या अदांनी व सौंदर्यांने चाहत्यांना घायाळ करणारी मुग्धा हिने मोठा संघर्षाचा काळ अनुभवला आहे. अभिनेत्री मुग्धा आज करोडो रुपयांची मालकीण असली तरी एक काळ असा होती की दिवसाला फक्त 100 रुपये कमावत होती. मुग्धा सुरुवातीला पेट्रोल पंपावर काम करत होती. यावेळी तिला फक्त 100 रुपये दररोज मिळत होते. त्यानंतर मुग्धा एका जीममध्ये कामाला लागली. या दरम्यान मुग्धाने लोकल ब्युटी कॉन्टेस्टमध्ये सहभागी होण्यास सुरुवात केली.

त्यानंतरही अभिनेत्री मुग्धा गोडसे हिचा संघर्ष चालूच होता. मुग्धाच्या आयुष्याला खरे वळण मिळाले जेव्हा तिने 2002 मध्ये ”ग्लॅमरस मेगा मॉडेल हंट’ (Glamourous Mega Model Hunt) जिंकला. यानंतर ती प्रसिद्धीझोतात आली. त्याच वर्षी, मध्य भारतातील सर्वोत्कृष्ट मॉडेल आणि बेस्ट नेशनल कॉस्ट्यूम हा मान देखील तिने पटकवला. 2004 साली मुग्धा फेमिना मिस इंडिया (Femina Miss India) स्पर्धेत सेमीफायनलमध्ये पोहोचली होती. 2008 साली मुग्धाने बॉलीवुडमध्ये येण्याचा निर्णय घेतला. तिने मधुर भंडारकर (Madhur Bhandarkar) यांच्या ‘फॅशन’ चित्रपटामधून (Fashion Movie) सिनेविश्वामध्ये पदार्पण केले. या चित्रपटामध्ये अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) व अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) देखील प्रमुख भूमिका साकारली होती. यामध्ये मुग्धाच्या अभिनय कौशल्याचे सर्वांनी कौतुक केले.

‘फॅशन’ चित्रपटामध्ये झळकल्यानंतर अभिनेत्री मुग्धा गोडसे (Mugdha Godse) हिची घौडदौड सुरु झाली.
यानंतर तिने ‘ऑल द बेस्ट’ (All The Best), ‘जेल’ (Jail), ‘हेल्प’ (Help), ‘हीरोइन’ (Heroine) या सारख्या
अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. अभिनय कौशल्याच्या बळावर मुग्धाचा मोठा चाहता
वर्ग निर्माण झाला आहे. एकेकाळी दिवसाला 100 रुपये कमावणारी मुग्धा गोडसे हि चित्रपटांमध्ये लीड ॲक्टर म्हणून कामे करु लागली. चित्रपटांमबरोबर मुग्धा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ही चर्चेत असते. तिचे ॲक्टर राहुल देव (Actor Rahul Dev) सोबतचे रिलेशनशिप (Mugdha Godse Affair) देखील चर्चेचा विषय ठरत असते. अनेकदा ते एकत्र फिरताना दिसत असतात.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Caste Verification Certificate | जात पडताळणी प्रमाणपत्र मिळणे होणार सहज; आठवडे बाजारात होणार शिबिरे

Pune Police News | भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यात देण्याचे कोंढवा पोलिसांचे आवाहन