अबब ! मुकेश अंबानींच्या रिलायन्स कंपनीनं ‘इतक्या’ कोटींचा GST भरला, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतातील सर्वात मोठे उद्योगपती रिलायंस इंडस्ट्रीचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी सोमवारी मोठी घोषणा केली आहे. रिलायंसच्या वार्षिक बैठकीत मुकेश अंबानी यांनी भविष्यातील आपल्या प्लॅनबाबत माहिती दिली आहे. रिलायंस कंपनी ही सर्वाधिक जीएसटी भरणारी कंपनी ठरल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. रिलायंसने मागील आर्थिक वर्षात सर्वाधिक ६७ हजार करोड रुपये जीएसटी म्हणून भरले आहेत.

रिलायंस जियो देशासह जगात सर्वात मोठे मोबाइल ऑपरेटर बनले आहेत. तसंच जियोचे तब्बल ३४ करोडहून अधिक लोक ग्राहक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसंच फक्त जीएसटीच नाही तर आयकर भरण्यातही रिलायंस कंपनी अग्रेसर आहे. तसंच रिलायंस कंपनीने एकूण १२१९१ करोड रुपये टॅक्स म्हणून भरल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसंच ही बातमी जियो आणि रिलायंस कंपन्यांसाठी अधिक महत्त्वाची आणि आनंदाची असल्याचेही म्हटलं जात आहे.

या बैठकीत त्यांनी दिलेल्या माहितीसह नवीन आणण्यात येणाऱ्या योजनांचीही माहिती दिली. तसंच रिलायंस कंपनीला मोठे गुंतवणुकदार मिळ्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. RIL या ऑईल आणि केमिकल डिविजनमध्ये साऊदी अरब कंपनीत “साऊदी अरेमेको” कंपनीने २० टक्के गुंतवणुक करण्याचे ठरवल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, ५ सप्टेंबर पासून, रिलायंसतर्फे जियो फायबरची सुरुवात करणार आहेत. यातर्फे ग्राहकांना ७००रुपयांचा प्लॅन देण्याचे योजले आहे. त्यात अनेक सुविधाही दिल्या जाणार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त