Social Media : महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य, मुकेश खन्ना झाले ‘ट्रोल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाभारतातील बीष्म पितामह आणि शक्तिमान मालिकेमुळे घराघरात पोहोचलेले प्रसिद्ध अभिनेते मुकेश खन्ना वादग्रस्त विधानामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. सध्या त्यांच्या जुन्या मुलाखतीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये ते मीटू वर मत व्यक्त केलं आहे. महिलांनी घराबाहेर जाऊन काम करण्यावर या व्हिडिओत आक्षेप घेतला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर मुकेश खन्ना प्रचंड ट्रोल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत खन्ना यांनी महिलांनी बाहेर जाऊन काम करण्यावर आक्षेप घेतला आहे. महिलांनी घराबाहेर पडणे हेच समस्येचे मूळ कारण आहे. महिलांनी घराबाहेर जाऊन कामास सुरुवात केली तेव्हाच मिटू ची समस्या सुरु झाली. त्यांना आज पुरुष्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची इच्छा आहे. पण यात सर्वात जास्त त्या मुलीची समस्या होते ज्याला आपल्या आईपासून दूर राहावे लागते. त्याला आयसोबत रहावे लागते. पुरुष पुरुष आहे महिला महिला आहे असे या व्हिडिओत खन्ना म्हणत आहे.

यावर यूजर्स चांगलेच भडकले आहेत. यात महिला युजर्सची संख्या जास्त असून एका महिला यूजर्सने तर खन्ना यांचा क्लासच घेतला खरे बोललात मुकेश खन्ना की, आम्ही महिला पुरुषांच्या बरोबर नाहीत. आम्ही पुरुषांच्या बरोबरीत नाही तर त्यांच्या पेक्षा उच्च स्थनी आहेत. कदाचित म्हणूनच तुमच्यासारखे पुरुष स्वत:ला असुक्षित मानतात. असे मत व्यक्त करताना लाज वाटली पाहिजे असेही या युजरने म्हंटले आहे. काय बकवास करतो हा माणूस. स्वतःच्या मानसिकतेला आणि विचारांना दोष द्यायला हवा, महिलांना नाही असे अन्य एका युजरने म्हंटल आहे.