Mukta Barve | मुक्ता बर्वेचे पुण्यात गेले बालपण; आजपर्यंत चालू आहे मनोरंजन विश्वात यशस्वी प्रवास

पोलीसनामा ऑनलाइन – मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे (Mukta Barve) हिने अनेक वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मुक्ताने नाटक, मालिका, चित्रपट अशा सगळ्यांच माध्यमातून भूमिका साकारल्या आहेत. मुक्ताचा मोठा चाहता वर्ग असून तिच्या सौंदर्यावर व अभिनय कौशल्यावर अनेक चाहते फिदा आहेत. पुण्यात लहानाची मोठी झालेल्या मुक्ता मनोरंजन विश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे. मुक्ता (Mukta Barve) ही तिच्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकत आली आहे अजूनही प्रेक्षक तिच्या आगामी चित्रपटाबाबत (Mukta Barve Upcoming Movies) उत्सुक असतात.

अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने अनेक नाटकं व मालिका केल्या आहेत. तिची आणि अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) यांची जोडी खूप गाजली आहे. तिने लहानपणापासून नाटकांमध्ये कामं केली आहेत. अभिनेत्री मुक्ता बर्वे हिचे बालपण पुण्यामध्ये गेले. तिला लहानपणापासून क्राफ्ट बनवण्याची आवड होती. तिने एका मुलाखतीमध्ये तिच्या लहानपणाबद्दल सांगितले आहे. ती म्हणाली की, “चिंचवडमध्ये माझं बालपण गेलं. मी लहानपणी कमी बोलणारी मुलगी होते. मला फार मोजक्या मित्रमैत्रिणी होत्या. माझं शिक्षण ललित कला केंद्रामध्ये (Lalit Kala Kendra) झाले आहे. तिथे एका वर्गात बसून अनेक महाविद्यालयाचे, वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण घेण्याची संधी मिळत होती. तिथे माझी मनोरंजन विश्वाशी निगडित अनेक दिग्गज कलाकारांशी भेट झाली. गिरिश कर्नाड (Girish Karnad), जब्बार पटेल (Jabbar Patel), विजया मेहता (Vijaya Mehta) असे अनेक दिग्गज मला भेटले. यामध्ये माझ्या कुटुंबियांनी नेहमीच प्रत्येक गोष्टीत खूप सपोर्ट केला आणि प्रोत्साहन दिले आहे.

अभिनेत्री मुक्ता बर्वे ही नेहमी तिच्या चित्रपटातील भूमिकांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. अनेक वर्षे तिचा रंगभूमीशी संबंध आहे. अगदी लहानपणापासून तिने नाटकांमध्ये कामं केलं आहे. ‘रुसू नका फुगू नका’ या नाटकामध्ये तिने बालपणी भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने नाटकांमध्ये काम करुन प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. मुक्ताने ‘आम्हाला वेगळे व्हायचंय, देहभान (Dehbhan), फायनल ड्राफ्ट (Final Draft) अशा नाटकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. नाटकांबरोबर मुक्ता बर्वे हिने छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये देखील भूमिका साकारल्या आहेत. मुक्ताच्या मालिकांनी तिची लोकप्रियता घराघरांत पोहचवली. मुक्ताने पिंपळपान (Pimpalpaan), बंधन, आभाळमाया (Aabhalmaya), श्रीयुत गंगाधर टिपरे , इंद्रधनुष्य, अग्निहोत्र (Agnihotra) या सुपरहिट मालिकांमध्ये पात्र साकारली आहे. अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने मालिका तर गाजवल्या पण चित्रपटांमध्ये देखील आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

अभिनेत्री मुक्ता बर्वे (Mukta Barve) हिने चकवा (Chakwa), मंगलाष्टक वन्स मोअर (Mangalashtak Once More), लग्न पहावे करून (Lagna Pahave Karun), डबलसीट (Double Seat), हायवे- एक सेल्फी आरपार (Highway Ek Selfie Aarpar), जोगवा (Jogwa) अशा चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तिच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालता आहे. मुक्ताच्या जीवंत अभिनयामुळे तिने प्रेक्षकांच्या मनात घर केले. तिचा सर्वात जास्त गाजलेला चित्रपट म्हणजे मुंबई पुणे मुंबई (Mumbai-Pune-Mumbai). या चित्रपटातील मुक्ताच्या अभिनयाचे सर्वांनी खूप कौतुक केले. या चित्रपटातील मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी (Mukta Barve And Swapnil Joshi)
ही जोडी प्रेक्षकांना खूप भावली. त्यानंतर या चित्रपटाचे दोन सिक्विल आले आहेत.
आता सध्या अभिनेत्री मुक्ता बर्वे ही ‘चारचौघी’ (Charchaughi) या नाटकात काम करत आहे.
तिच्या सोबत यामध्ये रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi), कादंबरी कदम (Kadambari Kadam),
पर्ण पेठे (Parna Pethe), निनाद लिमये (Ninad Limaye), श्रेयस राजे (Shreyas Raje),
पार्थ केतकर (Parth Ketkar) हे कलाकार प्रमुख भूमिका साकारत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Adah Sharma | केरला स्टोरी फेम अभिनेत्री अदा शर्माची तब्येत ढासळली; हॉस्पिटलमध्ये तातडीने केले ॲडमिट