Mula Mutha Riverfront Development | सांगवी ते वाकड मुळा नदीकाठ सुधार योजनेसाठी तीन कंपन्यांच्या निविदा आल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मुळा – मुठा नदी सुधार योजनेअंतर्गत (Mula Mutha Riverfront Development) टप्पा क्र. 1,2 आणि 3 अर्थात सांगवी पूल ते वाकड दरम्यानच्या कामासाठी 3 निविदा आल्या आहेत. या निविदांची तांत्रिक छाननी सुरू असून लवकरच पुढील कार्यवाही सुरू होईल, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. (Mula Mutha Riverfront Development)


पुणे (Pune Municipal Corporation (PMC) आणि पिंपरी चिंचवड महापालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) हद्दीतून वाहणाऱ्या मुळा – मुठा नद्यांच्या काठाचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. नदी स्वच्छ ठेवण्यासोबतच नदी काठावर नागरिकांना सहजगत्या आकर्षित करण्यासाठी जॉगिंग ट्रॅक, उद्यान, क्रीडांगण आदी सुविधां निर्माण करण्यात येत आहेत. सुमारे 44 कि. मी. च्या दोन्ही तिरांसाठी असलेली ही योजना 11 टप्प्यात करण्यात येत असून सुमारे पाच हजार कोटी रुपये खर्च आहे. यापैकी टप्पा क्र. 9, 10 आणि 11 चे काम ( संगमवाडी ते कल्याणीनगर) यापूर्वीच सुरू करण्यात आले आहेत.


तर सांगवी पूल ते वाकड दरम्यान च्या मुळा नदीच्या (Mula Mutha Riverfront Development) एका तीरावरील
आठ कि. मी. च्या कामाची निविदा पिंपरी चिंचवड महापालिकेने यापूर्वीच काढली आहे.
पुणे महापालिकेने दुसऱ्या तीरावरील पीपीपी तत्त्वावरील कामाची 303 कोटी रुपये कामाची निविदा मार्च मध्येच
काढली होती. परंतु प्रतिसाद न मिळाल्याने फेरनिविदा काढण्यात आली. यामध्ये टीएनटी, जे कुमार आणि एनसीसी या
तीन कंपन्या च्या निविदा आल्या आहेत. या निविदांची तांत्रिक तपासणी सुरू आहे, अशी माहिती प्रकल्प अधिकारी अधीक्षक अभियंता युवराज देशमुख यांनी दिली.


देशमुख यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड महापालिका एका तिरावरचे काम करणार आहे.
त्यांनी यापूर्वीच निविदा काढली असून मंजूर देखील केली आहे. पावसाळा आणि पुणे महापालिकेच्या कामाची प्रक्रिया
सुरू असल्याने अद्याप काम सुरू करण्यात आले न्हवते. तांत्रिक तपासणी नंतर पुणे महापालिका निविदा उघडणार आहे.
महापालिकेने वृक्षतोडी साठी परवानगी मागितली असून त्यावर निर्णय होयचा आहे.
हा निर्णय झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Police Inspector Promotion ACP / DySP | राज्यातील 104 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना सहाय्यक पोलिस आयुक्त / पोलिस उपअधीक्षक पदी बढती