Multibagger Stock | ‘या’ शेयरने एक महिन्यात दुप्पट केले पैसे ! गुंतवणुकदारांना मिळताहेत जबरदस्त रिटर्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Stock | 2021 मध्ये शेअर चढ-उतार दिसून आला आहे. परंतु, तरी सुद्धा असे अनेक शेयर आहेत ज्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. गेल्या वर्षी बाजारात लिस्ट झालेल्या 15 IPO ने जबरदस्त रिटर्न (High Return Stock 2022) दिला आहे. अशाच एक स्टॉकबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. (Multibagger Stock)


या शेअरने केले मालामाल
टाटा टेलिसर्व्हिस महाराष्ट्र लिमिटेड (Tata Teleservices Maharashtra Ltd) या टाटा समूहा (Tata Group) च्या शेयरने अवघ्या एका महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. या समभागाने गेल्या 6 महिन्यांत गुंतवणूकदारांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. टीटीएमएलच्या स्टॉकने गेल्या वर्षभरात जबरदस्त कामगिरी केली आहे.

 

सध्या, TTML (Tata Teleservices Maharashtra Ltd- TTML) चा शेअर 206 रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे. महिनाभरापूर्वी 2 डिसेंबरला तो 124 रुपयांवर होता. एका महिन्यात तो जवळपास दुप्पट झाला आहे. (Multibagger Stock)

 

एका वर्षात 26 पट रिटर्न देणारा स्टॉक
गेल्या एक वर्षातील या शेअरचा रेकॉर्ड पाहता हा स्टॉक 7.90 रुपयांवरून 206.35 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी टीटीएमएलच्या स्टॉकमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, तर आता त्याला 26 लाख रुपयांपेक्षा जास्त नफा झाला असता.

 

गेल्या वर्षी जुलैमध्ये हा स्टॉक 54 रुपयांवर होता, तो आता 206 रुपयांवर आहे.
जर एखाद्या व्यक्तीने सहा महिन्यांपूर्वीही या स्टॉकमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते,
तर त्याला आता 3.81 लाख रुपये मिळाले असते, म्हणजे सहा महिन्यांत तिप्पट नफा झाला असता.

कंपनीचे मजबूत मार्केट
TTML ही Tata Teleservices ची उपकंपनी आहे, जी सध्या तिच्या सेगमेंटमध्ये मार्केट लीडर आहे.
एवढेच नव्हे तर टाटा टेलि बिझनेस सर्व्हिसेसने नुकतीच व्यवसायासाठी देशातील पहिली स्मार्ट इंटरनेट लीज लाईन सुरू केली आहे.
या कंपनीच्या माध्यमातून अत्यंत कमी किमतीत हायस्पीड इंटरनेट नेटवर्कची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.

 

क्लाऊड आधारित सुरक्षा हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. जेणेकरून डेटा सुरक्षित ठेवता येईल.
या अर्थाने या कंपनीची बाजारपेठही मजबूत आहे.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Multibagger Stock | multibagger stock 2022 tata teleservices maharashtra ltd share give high return to investers high return stock

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Covaxin-Covishield Vaccines | ‘कोव्हॅक्सिन’ आणि ‘कोव्हिशिल्ड’ लशीचा ‘कॉम्बो’; 4 पट वाढवतो अँटीबॉडी प्रतिक्रिया

 

Coronavirus in Maharashtra | चिंताजनक! राज्यात ‘कोरोना’ रुग्णसंख्येत मोठी वाढ ! गेल्या 24 तासात 18,466 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Ajit Pawar | महाराष्ट्र खंबीर ! उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले – ‘2 वर्षांच्या काळात सरकारला साथ, सहकार्य दिलेल्या, सरकारवर विश्वास व्यक्त केलेल्या तमाम बंधुभगिनी, मातांचे, युवा मित्रांचे आभार’