Multibagger Stock | 21.49 रुपयांचा स्टॉक झाला 343.5 चा, तीन महिन्यात 1 लाखाचे झाले 15.98 लाख रुपये; तुमच्याकडे आहे का?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Multibagger Stock | शेयर बाजार नव्या उंचीवर पोहचला आहे. स्थानिक बाजाराने 60 हजारांचा आकडा ओलांडला आहे. यासोबत अनेक शेयर्स (Multibagger Stock) असे आहेत ज्यांनी आपल्या शेयरधरकांना मल्टीबॅगर रिटर्न (Multibagger stock) दिला आहे. अशाच काँटिनेन्टल केमिकल्स (Continental Chemicals stock) च्या शेयरबाबत आपण जाणून घेणार आहोत…

काँटिनेन्टल केमिकल्सच्या स्टॉकने तीन महिन्यातच आपल्या शेयरधारकांना जवळपास 1,500 टक्केचा रिटर्न दिला आहे. 24 जून, 2021 ला हा शेयर 21.49 रुपयांवरून वाढून 343.5 रुपये झाला. मागील तीन महिन्यात या शेयरने 1,497.25% रिटर्न (Multibagger Stock) दिला आहे.

गुंतवणुकदार (Stock Market) झाले मालामाल

Continental Chemicals stock प्राईसच्या हिस्ट्रीनुसार, तीन महिने अगोदर म्हणजे यावर्षी 24 जूनला या स्टॉकमध्ये गुंतवलेल्या 1 लाख रुपयांच्या रक्कमेचे आज 15.98 लाख रुपये झाले असते.
काँटिनेन्टल केमिकल्सचा शेयर बीएसई (BSE Sensex) वर आपल्या मागील बंदच्या तुलनेत 5% च्या वाढीसह 343.25 रुपयांच्या ऑल टाइम हायवर बंद झाला.

व्यवहाराच्या सत्रात या स्टॉकचे 5% अपर सर्किट राहिले. मागील 21 दिवसात शेयर 177.94% वाढला आहे.
शुक्रवारी बीएसईवर शेयर 4.99% च्या वाढीसह 343.25 रुपयांवर उघडला होता.

महिन्याभरात 192% ची वाढ

काँटिनेन्टल केमिकल्सचा शेयर 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसाच्या मूव्हिंग अ‍ॅव्हरेजपेक्षा जास्त आहे.
या वर्षाच्या सुरूवातीपासून शेयरमध्ये 1,706.58% ची वाढ झाली आहे.

एक महिन्यात 192% ची वाढ झाली आहे. फर्मचे मार्केट कॅप वाढून 77.20 कोटी रुपये झाले आहे.
9 मार्च, 2021 ला शेयर 52-आठवड्यांचा खालच्या स्तर 12.50 रुपयांवर आला होता. हा शेयर NSE वर लिस्टेड नाही.

 

जाणून घ्या काय आहे कंपनीचा व्यवसाय?

काँटिनेन्टल केमिकल्स हाताने बनवलेले साबण, डिटर्जंट आणि सौंदर्य प्रसाधन साहित्य बनवते.
तिचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट नोएडा, उत्तर प्रदेश (Noida- UP) मध्ये आहे.

शुद्ध लाभात 2000% ची वाढ

नोएडा येथील या कंपनीने आपल्या क्यू 1 शुद्ध लाभात 0.03 कोटी रुपयात 2000% ची वाढ नोंदली. जून 2020 तिमाहीसाठी शुद्ध लाभ 0.01 कोटी रुपये होता.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत स्टँडअलोन आधारावर विक्री 140% वाढून 0.12 कोटी रुपये झाली, जी मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत 0.05 कोटी रुपये होती.

 

Web Title : Multibagger Stock | multibagger stock continental chemicals give 1500 percent return in three month check share price

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Mumbai Expressway | पुणे मुंबई हायवेवर लोखंडी साहित्य घेऊन जाणारा कंटेनर उलटला; पुण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक खोळंबली

Traffic police | राज्यातील 10 लाख वाहनचालकांना वाहतूक पोलिसांकडून नोटिसा

Municipal Corporation Election | प्रत्येक जिल्ह्याची परिस्थिती वेगळी, कोणाशी आघाडी करायची याचा निर्णय स्थानिक नेते घेतील – अजित पवार (व्हिडीओ)