Multibagger Tata Stock | टाटा समुहाच्या या अनामित शेअरची कमाल, ३ वर्षात १२०० टक्केपेक्षा जास्त उडी

नवी दिल्ली : Multibagger Tata Stock | टाटा समूह (Tata Group) हा भारतातील सर्वात मोठ्या आणि जुन्या व्यावसायिक घराण्यांपैकी एक आहे, ज्याचा इतिहास १०० वर्षांहून अधिक जुना आहे. भारताच्या औद्योगिकीकरणात या समूहाने महत्त्वाची भूमिका बजावली असून शेअर बाजारात (Stock Market) टाटा कंपन्यांचे मोठे योगदान आहे. (Multibagger Tata Stock)

भारतीय बाजारपेठेतील दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Investor Rakesh Jhunjhunwala) यांना इतके प्रसिद्ध करण्यात टाटा समूहाच्या शेअर्सचा (Tata Group Shares) वाटा होता. त्याच टाटा समूहाच्या अशाच एका शेअरबद्दल आपण जाणून घेणार आहोत, जो फारसा प्रसिद्ध नाही, पण रिटर्नच्या बाबतीत मार्केटमधील सर्वोत्तम मल्टीबॅगर शेअर्सपैकी एक आहे.

मागील वर्षी टाटाने खरेदी केले शेअर्स
हा शेअर तेजस नेटवर्क्स (Tejas Networks) कंपनीचा आहे. ही कंपनी हाय-स्पीड इंटरनेट (High-Speed Internet Company) सेवा देते. याशिवाय, कंपनी ४जी/५जी मोबाइल बॅकहॉल, होलसेल बँडविड्थ सेवा यासारख्या सेवा प्रदान करते. याचे मुख्यालय गुरुग्राम येथे आहे. टाटा समूहाची होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्सने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पॅनाटोन फिनव्हेस्ट लिमिटेडच्या (Panatone Finvest Limited) माध्यमातून कंपनीतील आपली भागीदारी ५० टक्क्यांहून अधिक केली होती. अशा प्रकारे, टाटा सन्स आता तेजस नेटवर्कची बहुसंख्य भागीदार आहे आणि तिच्याकडे ५२.४५ टक्के शेअर आहेत. (Multibagger Tata Stock)

शेअरचा भाव
सध्या, तेजस नेटवर्कच्या एका शेअरची किंमत सुमारे ८४० रुपये आहे. सोमवारच्या व्यवहारात तो ०.८२ टक्क्यांनी घसरला आणि ८३९.९० रुपयांवर बंद झाला. गेल्या ५ दिवसात त्याची किंमत जवळपास एकाच स्तरावर आहे. तो एकदा ८९३ रुपयांपर्यंत पोहोचला होता, जो ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे. त्याच वेळी, तेजस नेटवर्कच्या स्टॉकची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ५१० रुपये आहे.

सध्याची शेअरची स्थिती
गेल्या एका महिन्यात तेजस नेटवर्कच्या शेअरमध्ये २.५० टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याच वेळी, या शेअरने मागील
६ महिन्यांत ४७ टक्क्यांहून जास्त उसळी घेतली आहे. या वर्षी जानेवारीपासून, शेअर ३८ टक्क्यांहून जास्त वाढला आहे,
तर मागील एका वर्षात त्याच्या किमतीत ३८ टक्क्यांहून कमी वाढ झाली आहे.

७,५०० चे झाले १०००००
सुमारे ३ वर्षांपूर्वी, तेजस नेटवर्कचा एक शेअर जवळपास रु.६५ मध्ये उपलब्ध होता. २८ ऑगस्ट २०२० रोजी, तेजस नेटवर्कच्या एका शेअरची किंमत ६३.९० रुपये होती, जी काल बाजार बंद झाल्यानंतर ८३९.९० रुपये झाली आहे. याचा अर्थ असा की गेल्या ३ वर्षांत टाटाच्या या नवीन आणि अनामित शेअरने १३ पटीने जास्त (सुमारे १२१४ टक्के) झेप घेतली आहे.
याचा अर्थ असा की जर एखाद्या गुंतवणूकदाराने ३ वर्षांपूर्वी या शेअरमध्ये सुमारे ७,५०० रुपये गुंतवले असते तर तो
आज लखपती झाला असता.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | 82 वर्षाच्या ज्येष्ठाच्या दक्षतेने हातचलाखीने फसविणारे चोरटे जेरबंद

Pune Crime News | असे पैसे मी रात्रीला खर्च करतो; पतीचे पैसे घेण्यास गेलेल्या महिलेचा कंपनी संचालकाकडून विनयभंग