अखेर निष्कर्षावर पोहचले पोलिस, समोर आलं सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं ‘सत्य’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई पोलिसांनी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास जवळपास पूर्ण केला आहे. पोस्टमार्टमचा डिटेल रिपोर्टसुद्धा पोलिसांना मिळाला आहे. पोस्टमार्टम करणार्‍या पाच डॉक्टरांचे मतसुद्धा पोलिसांनी जाणून घेतले. तसेच ज्या खोलीत सुशांतचा मृतदेह सापडला होता, ती खोली, पंखा, बेड आणि गळफासाची उंचीसुद्धा पोलिसांनी मोजली. केवळ आता फायनल रिपोर्टपूर्वी पोलीस व्हिसेरा रिपोर्टची प्रतिक्षा करत आहेत. पुढील एक-दोन आठवड्यात हा रिपोर्ट येणार आहे.

पोलिसांच्या तपासाचा निष्कर्ष – आत्महत्या
घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांचा इशारा आत्महत्येकडे आहे. आतापर्यंत केलेल्या चौकशीत देखील आत्महत्या हाच निष्कर्ष निघाला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूवरून त्याच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. परंतु, पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासावरून ही आत्महत्या असल्याच्या निष्कर्षावर पोलीस पोहचले आहेत. सुशांत सिंहच्या मृत्यू पाठीमागे कोणतेही षडयंत्र नाही, उलट हे थेट आत्महत्येचे प्रकरण आहे, असे पोलिसांचे मत आहे.

प्रकरण हाय प्रोफाईल असल्याने मुंबई पोलिसांनी प्रत्येक शक्यता पडताळून पाहिली. परंतु, तपासादरम्यान पोलिसांना असे काहीही आढळले नाही की, ज्यामुळे शंका उपस्थित होऊ शकते. या घटनेला मुंबई पोलीस आत्महत्या का मानत आहेत, ते जाणून घेवूयात…

आतून बंद होता रूमचा दरवाजा
ज्या रूममध्ये सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला, त्या रूमचा दरवाजा आतून बंद होता. या गोष्टीचे साक्षीदार सुशांतचे घरातील तीन कर्मचारी आणि मित्रांसह त्यांची बहिण सुद्धा आहे जी मुंबईत राहते. सुशांतची बहिण जेव्हा सुशांतच्या घरी पोहचली, तेव्हा तिने सुद्धा दरवाजा खोलण्याचा प्रयत्न केला. दरवाजा उघडण्यासाठी जेव्हा डुप्लीकेट चावी बनवणार्‍या मॅकेनिकल बोलावण्यात आले आणि जेव्हा त्याने दरवाजा उघडला तेव्हा सुशांतची बहिण तेथे उपस्थित होती. दरवाजा आणि टाळाच्या तांत्रिक तपासणीतही आढळले की, दरवाजाचे लॉक किंवा दरवाजाशी काहीही छेडछाड झालेली नव्हती. दरवाजा आतूनच बंद होता. याचा अर्थ हा होतो की, सुशांत आतमध्ये एकटा होता आणि आतून दरवाजा त्यानेच बंद केला होता.

केवळ एक इंचाचे अंतर
ज्या रूममध्ये सुशांतचा मृत्यू झाला, त्या रूममध्ये लावलेल्या सिलिंग फॅनची मोटर आणि रूममधील बेडमध्ये एकुण अंतर 5 फुट 11 इंच होते. तर सुशांतची हाईट 5 फुट 10 इंच होती. म्हणजे बेडवर उभे राहिल्यानंतर सुशांत आणि पंख्यामध्ये केवळ 1 इंचाचा फरक राहतो. सुशांतची बहिण, टाळा बनवणारा आणि घरातील अन्य तीन लोक आणि मित्रांनुसार जेव्हा रूमचा दरवाजा उघडला तेव्हा सुशांतचा मृतदेह बेडच्या दुसर्‍या बाजूला म्हणजे बेडच्या किनार्‍यावर अधांतरी लटकत होता. म्हणजे सुशांतचा मृतदेह बेडवर नव्हता आणि त्याचे पायही बेडवर नव्हते. बेडच्या दुसर्‍या बाजूला जेथे सुशांतचा मृतदेह लटकत होता, तेथून पंख्याचे अंतर आणि उंची 8 फुट 1 इंच होती.

फॉरेन्सिक एक्सपर्ट आणि पोलिसांनुसार पंखा आणि बेडमध्ये जेवढी उंची होती, त्या उंचीवर सुशांत आपले दोनही हात उचलून सहज पंख्यांवर गाठ बांधू शकत होता. कारण बेड आणि पंख्याममधील अंतर आणि सुशांतची उंची दोन्हीमध्ये अवघा एक इंचाचा फरक होता. यासाठी गळफास गळ्यात टाकल्यानंतर सुशांत बेडच्या दुसर्‍या बाजूला दोन्ही पाय फेकून हवेत लटकला. पोलिसांनुसार घटनास्थळावर काढलेले फोटो आणि एक्सपर्टने जो अंदाज लावला आहे, त्यामध्ये स्पष्ट होते की, सिलिंग फॅन बेडच्या मधोमध लावलेला नव्हता. यासाठी पंख्याच्या खाली बेडच्या दुसर्‍या बाजूला खुप गॅप होता.

शरीरावर जखमा नव्हत्या
सुशांतच्या शरीरावर कोणत्याही प्रकारची जखम नव्हती. तसेच कुठेही खरचटलेले सुद्धा नव्हते. जर खोलीत झटापट झाली असती तर खुणा जरूर मिळाल्या असत्या. सुशांतच्या दोन्ही हातांच्या बोटांची नखे सुद्धा स्वच्छ होती.

कपडेसुद्धा व्यवस्थित होते
मृत्यूच्या वेळी सुशांतने शॉर्ट आणि टी शर्ट घातले होते. कपड्यांची तपासणी केली असता त्यावर कोणत्याही खुणा नव्हत्या किंवा अशा गोष्टी नव्हत्या, ज्यावरून समजू शकते की, सुशातची कुणाशी तरी झटापट झाली असावी.

प्रत्यक्षदर्शींचे एकसमान जबाब
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतरचे एकुण सहा प्रत्यक्षदर्शी होते. सुशांतचे तीन कर्मचारी आणि एक मित्र जो त्याच घरात उपस्थित होता. सुशांतची बहिण जी दरवाजा खोलताना उपस्थिती होती, आणि तो टाळेवाला, ज्याने डुप्लीकेट चावी बनवून दरवाजा उघडला.

पोलिसांनी या सहाजणांचे वेगवेगळे जबाब घेतले असता ते एकसारखे होते. 14 जूनच्या दुपारची जी कहाणी या सहा जणांनी सांगितली ती एकसारखी होती. विशेषता सुशांतच्या बहिणीचा जबाब खुप महत्वाचा होता.

व्हिसेरा रिपोर्टची प्रतिक्षा
पोस्टमॉर्टम रिपोर्ट, फॉरेन्सिक एक्सपर्ट आणि सुमारे 30 लोकांचा जबाब यावरून मुंबई पोलिस एकुण या निष्कर्वावर पोहचले आहेत की, सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली आहे. परंतु आपला फायनल रिपोर्ट तयार करण्यापूर्वी पोलीस व्हिसेरा रिपोर्टची वाट पहात आहेत. जो जुलैच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या आठवण्यात येऊ शकतो. जोपर्यंत व्हिसेरा रिपोर्ट येणार नाही, पोलीस फायनल रिपोर्ट दाखल करणार नाहीत.