मुंबईत सीएसएमटी स्टेशनजवळ फूट ओव्हर ब्रिज कोसळला, दोघांचा मृत्यू : 23 गंभीर जखमी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)  रेल्वे स्थानकाबाहेरील काम रुग्णालयाच्या गल्लीकडे तसेच किला कोर्टाकडे जाणारा पादचारी पुलाचा अर्धा भाग आज सायंकाळी ७. ३० वाजताच्या सुमारास कोसळला आहे. त्यामुळे पुलाखालून जे. जे. फ्लायओव्हरकडे जाणारा आणि विरुद्ध दिशेने म्हणजेच फोर्टकडे जाणारी वाहतूक खोळंबली आहे. दोन्ही मार्ग बंद करण्यात आले आहेत.  घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. काही २३ जण जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दुर्घटनेत दोन जण दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपूर्वा प्रभू (वय- ३५), रंजना तांबे (वय- ४०) या दोन महिलांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.

सीएसएमटी परिसरात बरीच कार्यालये असून चाकरमानी घरी जाण्याच्या वेळेस म्हणजेच वर्दळीच्या वेळी ही दुर्घटना घडली आहे. एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावर झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर ही गंभीर घटना घडली आहे. २३ लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी बचावकार्यासाठी दाखल झाले आहेत.कामा रुग्णालयातून सीएसएमटीकडे येणारा दरवाजा बंद करण्यात आला आहे. साडेसातच्या आसपास ही घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे. जखमींना सायन, सेंट जॉर्ज आणि जीटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या पुलाजवळ अंजुमन इस्लाम ही शाळा असून अनेकजण कार्यालयात आणि रेल्वे स्थानकाकडे जाण्या – येण्यासाठी या पुलाचा वापर केला जातो.

ह्याहि बातम्या वाचा –

२० लाखांच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण करणारे गजाआड

दहशतवाद्यांकडून नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यावर गोळीबार

Loksabha 2019 : बीडमध्ये रंगणार मुंडे Vs मुंडे ?

वंचित आघाडीसोबत युतीच्या चर्चेसाठी शेवटपर्यंत तयार : अशोक चव्हाण

निवृत्त IAS आधिकऱ्याच्या घरावर आयकर विभागाचा छापा