Mumbai Crime | 13 वर्षाच्या भावाला पॉर्न व्हिडीओ दाखवत होती बहिण, पुढं झालं असं काही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन मुंबईमध्ये (Mumbai Crime) बहिण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण मुंबई हादरुन गेली आहे. एका अल्पवयीन 16 वर्षाच्या बहिणीने आपल्या 13 वर्षाच्या भावाला अश्लील व्हिडीओ दाखवून (Sister shows Videos to brother) त्याला लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. ज्यावेळी मुलगी पाच महिन्याची गर्भवती राहिली त्यावेळी हा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. सध्या या मुलीवर मुंबईतील (Mumbai Crime) एका रुग्णालयात उपचार सुरु असून या घटनेचा तपास मुंबई पोलीस करीत आहेत. ही घटना मुंबईतील कुरार पोलीस स्टेशनच्या (Kurar Police Station) हद्दीत घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधीत मुलीला अश्लील व्हिडीओ पाहण्याचे व्यसन लागले होते.
ती आपल्या लहान भावासोबत कॉटखाली झोपायची.
दरम्यान ती आपल्या मोबाईवर भावाला अश्लील व्हिडीओ दाखवत होती.
त्यानंतर तीने भावावर दबाव टाकून त्याला लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पडले.
मागील अनेक दिवसांपासून हा संतापजनक प्रकार सुरु होता.
यातूनच ही मुलगी गर्भवती राहिली. मुलगी गर्भवती (Pregnant) राहिल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली.

या प्रकरणात मुलीच्या अल्पवयीन भावाकडे चौकशी सरु असून त्याने बहिणीच्या जबाबत तथ्य असल्याचे पोलिसांना सांगितले आहे.
पीडित भावाने पोलिसांना सांगितले की, जेव्हा तो लैंगिक संबंध ठेवण्यास नकार देत होता.
तेव्हा त्याची बहिण त्याला मारहाण करायची आणि घटनेची वाच्यता करण्याची धमकी देत होती.
त्यामुळे बहिणीच्या धमकीला घाबरून तो बहिणीसोबत अश्लील कृत्य करण्यास तयार व्हायचा.

 

पोलिसांनी दोघांचे जबाब नोंदवून घेतले असून याप्रकरणी गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
पीडित लहान भावाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
तर मुलीवर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पोलीस सध्या आई वडिलांची डीएनए (DNA) चाचणी करत आहे.
डीएनएचा रिपोर्ट आल्यानंतर अधिक माहिती मिळू शकेल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
पुढील तपास कुरार पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करीत आहेत.

 

Web Title : Mumbai Crime | 16 year old girl has forced 13 year old brother have sex by showing him pornographic videos

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Bank News | बँकेशी संबंधित लोकांसाठी खुशखबर ! घरबसल्या मिळतोय 10 लाख रुपयांचा फायदा, लवकर करा ‘हे’ काम; जाणून घ्या

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! सप्टेंबरमध्ये होईल ‘डबल’ फायदा, इतका वाढेल महिन्याचा पगार, जाणून घ्या

MNS MLA Raju Patil | म्हाडा सोडतीत कथित गैरव्यवहार प्रकरणात मनसे आमदार राजू पाटील यांच्याविरोधात फौजदारी दावा