Mumbai Crime | बर्थडे पार्टीसाठी बोलावलं अन् दिलं गुंगीचं औषध, मुंबईमध्ये पंचतारांकित हॉटेलमध्ये महिलेवर ‘रेप’

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  मुंबईतील (Mumbai Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये (Five star hotel) एका महिलेवर बलात्कार (Rape) झाल्याची खळबळजनक घटना पुढं आली आहे. पीडित महिलेचा वाढदिवस (Birthday) साजरा करण्यासाठी हॉटेलमध्ये बोलावून तिला गुंगीचे औषध देण्यात आले. नंतर तिच्यावर हॉटेल रुममध्ये बलात्कार (Rape) केल्याचा आरोप पीडित महिलेनं केला आहे. अविन अग्रवाल (Avin Agarwal) असं त्या आरोपीचं (Accused) नाव आहे. त्याच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल (Mumbai Crime) करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, पीडित महिला आणि आरोपी अविन अग्रवालची (Avin Agarwal) सोशल मीडियावर ओळख झाल्याची माहिती समोर आली आहे.
आरोपी अग्रवालने पीडित महिलेला तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बोलावलं होतं.
पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलावून तिच्या ड्रिंकमध्ये (Drink) आरोपी अग्रवालने गुंगीचं औषध मिसळून दिल्याचा आरोप केला गेला आहे. ड्रिंक प्यायल्यानंतर पीडित महिला बेशुद्ध झाली होती.
शुद्धीवर आल्यानंतर ती रुममध्ये एकटीच होती. या घटनेची माहिती तिने कुटुंबियांना दिली आहे.
कुटुंबीयांनी अगोदर याबाबत डॉक्टर आणि नंतर जवळच्या वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये (Versova police station) तक्रार दाखल केली.

या दरम्यान, पीडित महिलेच्या तक्रारीनंतर आरोपीच्या विरोधात आयपीसी कलम 328 आणि 376 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे प्रकरण अंधेरीतील वर्सोवा पोलिस ठाण्यातून शून्य एफआयआर (FIR) अंतर्गत वरळी पोलिस ठाण्यात (Worli Police Station) वर्ग करण्यात आले आहे.
मात्र, गुन्हा नोंदवून घेतल्यानंतर अजूनही आरोपी फरार आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title : mumbai crime mumbai five star hotel lady rape FIR on avin agarwal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

King Cobra | महिलेने हातात पकडला ‘किंग कोब्रा’, महिलेच्या धाडसाचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

Ajit Pawar | पुणेकरांना आणखी दिलासा मिळणार ! सर्व व्यवहार रात्री 8 पर्यंत सुरु?

Pune News । पुण्यातील महिला पोलिस उपायुक्तांच्या ‘त्या’ व्हायरल Audio Clip ची गृहमंत्र्यांकडून गंभीर दखल (ऑडिओ क्लीप)