Mumbai Crime News | मुंबईमध्ये एअर होस्टेस तरुणीची गळा चिरुन हत्या; साफ सफाई करणाऱ्याला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Crime News | मुंबईमध्ये राहत्या घरी 23 वर्षीय एअर होस्टेसची हत्या (Murder Case) करण्यात आली असून गळा चिरलेल्या अवस्थेमध्ये तिचा मृतदेह आढळला आहे. हत्येच्या या प्रकारामुळे पवई परिसरात खळबळ उडाली आहे. पवई परिसरातील एन जी को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या (N G Co-Operative Housing Society) इमारतीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून पवई पोलीस स्टेशनच्या (Powai Police Station) पोलिसांनी तातडीने घटना स्थळी धाव घेतली आहे. (Mumbai Crime News) राहत्या घरामध्ये एअर होस्टेसचा मृतदेह आढळून आल्याने या प्रकरणी पोलिसांनी इमारतीमध्ये साफ सफाईचे काम करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

पवई परिसरातील (Powai Murder Case) मरोळ मारहाव रोडवर असलेल्या एन जी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये हा मृतदेह आढळला असून त्या तरुणीचे नाव रुपल ओग्रे (Rupal Ogre) असे आहे. रुपल ही मुळची छत्तीसगड (Chhattisgarh) राज्यातील असून ती एअर इंडियाच्या (Air India) प्रशिक्षणासाठी मुंबई शहरात आली होती. मुंबईमध्ये राहत असलेल्या घरात तिचा मृतदेह आढळून आला आहे. पवई पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरु आहे. मध्यरात्री माहिती मिळताच पवई पोलिसांनी सोसायटीमध्ये धाव घेतली. रुपलच्या राहत्या घरामध्ये तिचा गळा चिरलेला मृतदेह आढळून आला. पंचनामा करुन तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयामध्ये (Cooper Hospital) पाठवण्यात आला आहे. पवई पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 302 अन्वये (IPC Section 302) अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या शोधासाठी चार पथकं देखील तयार करण्यात आली आहेत.

मृत अवस्थेमध्ये सापडलेली तरुणी ही एअर होस्टेसच्या ट्रनिंगसाठी मुंबईमध्ये आली होती.
ती तिच्या बहिणीसोबत व मित्रासोबत त्याच घरामध्ये राहत होती.
परंतु मागील आठ दिवसांपासून रुपल एकटीच घरात राहत होती. ती एकटी असताना तिची हत्या करण्यात आली आहे.
रुपलच्या घरांनी तिला अनेक कॉल केले मात्र तिच्यासोबत संपर्क होत नसल्यामुळे तिच्या घरांची स्थानिक मित्राला
संपर्क साधला. ते लोक रुपलच्या घरी चौकशी करण्यासाठी तिच्या पवईच्या घरी गेले.
तिचे घर हे आत मधून बंद असल्याचे त्यांना कळाले. अनेक वेळा बेल वाजवल्यानंतर देखील आतमधून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
त्यानंतर त्यांनी पवई पोलिसांना याबाबत कळवले. आणि डुप्लिकेट चावीच्या मदतीने फ्लॅट उघडला. पोलीस आत मध्ये गेल्यानंतर या एअर हॉस्टेस गळा चिरलेल्या अवस्थेत आढळली. यानंतर तिला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल नेण्यात आलं, तिथे तिला मृत घोषित करण्यात आलं. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीसांनी अज्ञाताच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला असून साफ सफाई करणाऱ्या व्यक्तीला
चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. पोलीस या इसमाची चौकशी करत असून चौकशी अंती सत्य बाहेर येईल असा
पोलिसांचा अंदाज आहे. एअर होस्टेट तरुणीची गळा चिरुन हत्या करण्यात आल्यामुळे मुंबई शहर
(Mumbai Crime News) हादरले असून सर्व स्तरावरुन हळहळ व्यक्त केली जात आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime News | पुण्यातील सिंहगड रोड परिसरात खून; प्रचंड खळबळ