Mumbai CSMT-Goa Madgaon-Vande Bharat Express | मुंबई-गोवा वंदे भारत आता 6 दिवस; नवे वेळापत्रक या तारखेपासून लागू

मुंबई : Mumbai CSMT-Goa Madgaon-Vande Bharat Express | दिवाळी सुट्टी आणि नववर्ष स्वागत करण्यासाठी कोकण, गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईहून गोव्याला जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस आता दररोज धावणार आहे. सध्या ही एक्स्प्रेस आठवड्यातील ३ दिवस धावते. आता ती शुक्रवार वगळता इतर सर्व ६ दिवस धावणार आहे. कोकण रेल्वेवर १ नोव्हेंबरपासून गैर-पावसाळी वेळापत्रक लागू होईल. (Mumbai CSMT-Goa Madgaon-Vande Bharat Express)

यामुळे सीएसएमटी – मडगाव – सीएसएमटी वंदे भारतची सफर प्रवाशांना शुक्रवार वगळता दररोज अनुभवता येईल. शुक्रवारी देखभाल-दुरुस्तीसाठी वंदे भारत धावणार नाही. (Mumbai CSMT-Goa Madgaon-Vande Bharat Express)

मुंबई-गोवा रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मडगाव – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

भारतीय रेल्वेवरील प्रतिष्ठित हजरत निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेससह एकूण ४४ मार्गावरील ८८ रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार आहे. यात प्रवासी पसंतीच्या जनशताब्दी, तेजस, दुरांतो, मत्स्यगंधा, हमसफर, मांडवी, मरूसागर, कोकणकन्या, तुतारी, गोवा संपर्क क्रांती यांचा समावेश आहे.

कोकणात पावसाचे प्रमाण खुपच जास्त असल्याने कोकण रेल्वेवर दरड कोसळण्याची भीती असते.
यामुळे पावसाळी वेळापत्रकात कोकण रेल्वेवरील विभागात ताशी ७५ किमी अशी वेगमर्यादा असते.

पावसाळा संपला की गैर पावसाळी वेळापत्रक लागू होते. या वेळापत्रकात ठराविक वेगमर्यादा नसते.
यामुळे कमाल वेगाच्या नियमानुसार मेल-एक्स्प्रेस धावतात. मुंबई-गोवा मार्गावर काही भागांसाठी रेल्वेगाड्यांना १०० ते १२० ताशी किमी या वेगाची मंजुरी आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Ravindra Dhangekar On Pune Drug Case | ‘…अन्यथा पोलीस बनावट चकमकीत ललित पाटीलला मारतील’, आमदार रविंद्र धंगेकरांचा गंभीर आरोप (Video)

Sanjay Raut On Devendra Fadnavis | संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाले – ‘…तर श्रीराम तुमचा धनुष्यबाणाने वध करेल’

Nilesh Narayan Rane Quit Politics | आता राजकरणात मन रमत नाही, मी राजकारणातून कायमचा बाजूला होतोय; निलेश राणेंची निवृत्तीची घोषणा