ड्रग्ज केस : भारती-हर्षला ‘बेल’ देण्यासाठी केली मदत ?, NCB मुंबईचे 2 अधिकारी निलंबीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   ड्रग्ज रॅकेट प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) ने आपल्याच दोन अधिकार्‍यांवर अ‍ॅक्शन घेतली आहे. मुंबई एनसीबीच्या दोन अधिकार्‍यांना सस्पेंड करण्यात आले आहे, त्यांच्यावर संशय आहे की, कॉमेडियन भारती सिंह, तिचा पती हर्ष आणि दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्माला जामीन मिळवून देण्यात त्यांची भूमिका संशयास्पद राहिली आहे.

याशिवाय एनसीबीच्या वकिलाच्या भूमिकेचीही चौकशी केला जात आहे. कारण जेव्हा या स्टार्सच्या जामिनावर सुनावणी होणार होती, तेव्हा वकील हजर राहिले नव्हते, ज्यामुळे एनसीबीची बाजू मांडली गेली नाही. या दोन्ही अधिकार्‍यावंर विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

काही दिवसांपूर्वी एनसीबीने कॉमेडियन भारती सिंहच्या घरातून सुमारे 86.5 ग्रॅम गांजा जप्त केला होता. ज्यानंतर भारतीला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवले होते. जेव्हा भारतीने न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला तेव्हा तिला सहज जामीन मिळाला, कारण एनसीबीचा कुणीही अधिकारी किंवा वकील कोर्टात हजर नव्हता.

अशाच प्रकारे चित्रपट अभिनेत्री दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशच्या बाबतीत झाले होते, तिच्याकडून एकूण 1.7 ग्रॅम हॅश जप्त झाले होते. जेव्हा करिश्माने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला, तेव्हासुद्धा एनसीबीचा कुणीही अधिकारी कोर्टात नसल्याने जामीन मिळाला. आता एनसीबीकडून एनडीपीएस कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे, ज्यामध्ये भारती सिंह, हर्षला मिळालेल्या जामिनाला आव्हान देण्यात आले आहे.

चित्रपट अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अनेक एजन्सीजने मुंबईत तळ ठोकला आहे. केसच्या तपासादरम्यान ड्रग्जशी संबंधित गोष्टी समोर आल्या होत्या, ज्याचे धोगेदारे अजूनही जुळत चालले आहेत. आतापर्यंत अनेक फिल्म स्टार्स, टीव्ही स्टार्स, प्रॉडक्शन कंपन्यांशी संबंधित लोकांची चौकशी केली अहे.