Mumbai Fake Vaccination Scam | 350 कामगारांचे बोगस लसीकरण ! मुख्य आरोपी डॉ. मनिष त्रिपाठीवर आणखी एक FIR

नवी मुंबई न्यूज (Navi Mumbai News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – काही दिवसांपूर्वी मुंबईतील बोगस लसीकरण प्रकरण (Mumbai Fake Vaccination Sacm) समोर आलं होतं. या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. मनिष त्रीपाठी (main accus Dr. Manish Tripathi) याचा अटकपूर्व जामीन अर्ज (Pre-arrest bail application) फेटाळल्यानंतर त्रिपाठीने पोलिसांमध्ये आत्मसमर्पण (Surrender) केलं. त्यानंतर त्रिपाठी याच्यावर आणखी एक गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. कंपनीतील 350 कामगारांचे बोगस लसीकरण (Fake vaccination of workers) केल्या प्रकरणी त्रिपाठीसह तीन जणांवर तुर्भे पोलीस ठाण्यात (Turbhe police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. आरोपीने बनावट लसीकरण (Fake Vaccination Scam) करुन कंपनीकडून 4 लाख 24 हजार रुपये उकळले होते. Mumbai Fake Vaccination Scam | The main accused in the bogus vaccination case, Another FIR on Dr. Manish Tripathi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

शिरवणे एमआयडीसी मधील अटोम्बर्ग टेक्नॉलॉजी कंपनीतील कामगारांना बनावट लस देण्यात (Fake Vaccination in Atomberg technology at Shiravane MIDC) आली.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कल्पेश पद्माकर पाटील Kalpesh Padmakar Patil (वय-29) यांनी नवी मुंबईतील तुर्भे पोलीस ठाण्यात (Turbhe police station) फिर्याद दिली आहे.
कल्पेश पाटील यांच्या फिर्यादेवरुन तुर्भे पोलिसांनी डॉ. मनिष त्रीपाठी (Dr. Manish Tripathi) (वय-35 रा. शिवम सुंदरम हॉटेल समोर, ठाकुर कॉम्प्लेक्स, कांदीवली, ईस्ट मुंबई), करीम (वय-25 पूर्ण नाव माहित नाही) आणि एका अनोळखी व्यक्तीवर माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम
(Information Technology Act) (66) (सी) (डी), साथीचा रोग अधिनियम (Epidemic Act) 1897 कलम 3 प्रमाणे गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

शिरवणे एमआयडीसी मधील अटोम्बर्ग टेक्नॉलॉजी या कंपनीत (Atomberg technology at Shiravane MIDC) हे बनावट लसीकरण (Fake Vaccination) झाले आहे.
कंपनीतर्फे कामगारांसाठी लसीकरण शिबीर (Vaccination camp) भरवण्यात आले होते.
या लसीकरणाची जबाबदारी केईसीपी हेल्थ केअर हॉस्पिटलवर (KECP Health Care Hospital) सोपवण्यात आली होती.
त्यानुसार डॉ. मनिष त्रिपाठी (Dr. Manish Tripathi) यांनी त्यांचे पथक त्या ठिकाणी पाठवले होते.
23 एप्रिल रोजी हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.
त्यावेळी कंपनीतल्या 350 कामगारांचे लसीकरण (350 workers Vaccination) करुन 4 लाख 24 हजार रुपये घेतले होते.

लसीकरण केल्यानंतर कामगारांना नानावटी हॉस्पिटलच्या (Nanavati Hospital) नावचे बनावट प्रमाणपत्र (Fake certificate) देखील देण्यात आले होते.
मात्र काही कामगार दुसरा डोस घेण्यासाठी गेले असता, त्यांना पहिल्या डोस घेतल्याचे देण्यात आलेले प्रमाणपत्र बनावट (Fake certificate) असल्याचे समोर आले.
त्यानुसार कंपनीतर्फे पोलीस उपायुक्त सुरेश मेंडगे (Deputy Commissioner of Police Suresh Mendge)यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती.

त्याद्वारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र आव्हाड (Senior Police Inspector Rajendra Awhad), उपनिरीक्षक रमेश चव्हाण (Sub-Inspector Ramesh Chavan) यांच्यामार्फत तपास सुरु होता.
यामध्ये कंपनीच्या 350 कामगारांना बनावट लस (Fake Vaccination) देण्यात आल्याचे समोर आले. त्यानुसार शुक्रवारी रात्री तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Turbhe MIDC Police Station) या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. मनिष त्रीपाठी (main accus Dr. Manish Tripathi) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र आव्हाड (Senior Police Inspector Rajendra Awhad) करित आहेत.

Web Title : Mumbai Fake Vaccination Scam | The main accused in the bogus vaccination case, Another FIR on Dr. Manish Tripathi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Thane-Kalyan Crime News | कल्याणजवळ गजा मारणे रॅली प्रकरणाची पुनरावृत्ती, जाणून घ्या प्रकरण