Mumbai High Court | शासकीय रूग्णालयातील मृत्यू : हायकोर्टाने ‘त्या’ पत्राची घेतली गंभीर दखल, दिले ‘हे’ आदेश

मुंबई : Mumbai High Court | नांदेड शासकीय रूग्णालय (Nanded Govt Hospital) आणि घाटी रूग्णालयात (Ghati Hospital) औषधांअभावी अनेक रूग्णांना जीव गमवावा लागल्याने राज्याच्या आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. इतका गंभीर प्रकार होऊन देखील कोणतीच कारवाई संबंधित मंत्र्यावर होत नसल्याने एका वकीलाने हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना एक पत्र दिले होते. या पत्राची दखल घेतल न्यायाधीशांनी महत्वाचे आदेश दिले आहेत. (Mumbai High Court)

नांदेड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मृत्यूंबाबत उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घ्यावी, याकरिता अ‍ॅड. मोहित खन्ना यांनी मंगळवारी एक पत्र मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे सादर केले होते. न्यायालयाने या पत्राची दखल घेत संबंधित वकिलांना यासंदर्भात याचिका दाखल करण्याचे निर्देश बुधवारी दिले. (Mumbai High Court)

अ‍ॅड. मोहित खन्ना यांनी हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रात नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ३० सप्टेंबरपासून अर्भकांसह ३१ मृत्यू आणि २ ते ३ ऑक्टोबर दरम्यान छत्रपती संभाजीनगर शासकीय रुग्णालयात किमान १४ मृत्यूंबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी ठाणे महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल रुग्णालयात ऑगस्टमध्ये २४ तासांत १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही नमूद केली आहे.

अ‍ॅड. खन्ना यांनी पत्रात म्हटले आहे की, रुग्णालयांनी प्रसारमाध्यमांपुढे केलेल्या विधानात बेड, वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर व अन्य वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याचा उल्लेख केला आहे. या सुविधांचा अभाव म्हणजे राज्य घटनेने बहाल केलेल्या जीवन जगण्याचा अधिकाराचे उल्लंघन होय. राज्य सरकार त्यांचे कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरले आहे, असे खन्ना यांनी पत्रात म्हटले आहे.

या पत्राची दखल आज न्यायालयाने घेतली आणि निर्देश देताना म्हटले की, यासंदर्भात याचिकादारांनी याचिका दाखल करावी.

नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सोमवारी २४ तासांत २४ रुग्णांचा
औषधांअभावी मृत्यू झाला. पुन्हा मंगळवारी ११ अत्यवस्थ रूग्णांचा मृत्यू झाला. यात ८ बालकांचा समावेश होता.
दोन दिवसांत तब्बल ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. ३६ शिशुंसह ५९ रुग्ण मृत्यूशी झुंज देत आहेत.
दरम्यान, या प्रकरणी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधीपक्ष करत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | येरवडा कारागृहात कैद्यामध्ये पुन्हा राडा ! कैद्यावर धारदार वस्तूने वार

ACB Trap News | 10 हजार रुपये लाच घेताना विस्तार अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात