Mumbai High Court On Haj House Kondhwa | हज हाऊसची उभारणी धर्मनिरपेक्ष, मिलिंद एकबोटेंना मुंबई उच्च न्यायालयाचा दणका

पुणे : Mumbai High Court On Haj House Kondhwa | हज हाऊसची उभारणी करणे ही धर्मनिरपेक्ष कृती आहे, धार्मिक कृती नव्हे. त्यामुळे स्वत:ला गोंधळात पाडू नका, अशी स्पष्टोक्ती मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे. समस्त हिंदू आघाडीचे नेते मिलिंद एकबोटे यांच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने मत नोंदवले. (Mumbai High Court On Haj House Kondhwa)

या याचिकेतील तक्रार वैयक्तिक नसून सार्वजनिक स्वरूपाची असल्याने रिट याचिकेचे रुपांतर जनहित याचिकेत करत असल्याचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय व न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.

मिलिंद एकबोटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अ‍ॅड. कपिल राठोड यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत मागणी केली होती की, पुणे महापालिकेच्या हद्दीत कोंढवा येथील जमिनीवर हज हाऊसचे बेकायदा बांधकाम सुरू आहे.
या जमिनीवर आधी नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्याबाबतचे आदेश होते.
त्यात बदल करून हज हाऊसचे बांधकाम सुरू केले.
हे बांधकाम धार्मिक कृतीच्या प्रकारात मोडते, जे सरकारला करता येत नाही.

या सुनावणीत पुणे महापालिकेतर्फे बाजू मांडताना अ‍ॅड. अभिजीत कुलकर्णी यांनी म्हटले की,
जमीन वापरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. शिवाय हज हाऊसच्या इमारतीच्या
दोन मजल्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. यावर खंडपीठाने पुणे महापालिका व राज्य सरकारला
नोटीस जारी करून म्हणणे मांडण्यास सांगितले आणि सुनावणी तहकूब केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Lok Adalat | अपघाती मृत्यू झालेल्या नोकरदाराच्या कुटुंबीयांना एका वर्षात न्याय