Pune Lok Adalat | अपघाती मृत्यू झालेल्या नोकरदाराच्या कुटुंबीयांना एका वर्षात न्याय

पुणे : Pune Lok Adalat | एक सरकारी कर्मचाऱ्याचा कामानिमित्त सोलापुरहून मुंबईकडे जात असताना कारला ट्रकने धडक दिल्याने अपघात होऊन मृत्यू झाला होता. ही घटना गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात घडली होती. या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना नुकसान भरपाईची रक्कम लोक अदालतच्या निर्णयामुळे एक वर्षाच्या आत मिळाली आहे. (Pune Lok Adalat)

अपघातात मृत्यू झालेल्या सरकारी नोकरदाराच्या कुटुंबीयांना ८६ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय लोक अदालतमध्ये तडजोडी अंती घेण्यात आला. मृत कर्मचाऱ्याच्या कारला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये इंदापूर येथे अपघात झाला होता. (Pune Lok Adalat)

मृत सरकारी कर्मचाऱ्याची पत्नी, आई आणि दोन मुलांनी येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरणात गो-डिजिट जनरल इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात अ‍ॅड. जी. पी. शिंदे यांच्यामार्फत नुकसान भरपाईसाठी दावा केला होता.

मृत्यू झाला तेव्हा कर्मचाऱ्याचे वय ४९ होते. त्यांना दरमहा ६० हजार रुपये पगार होता.
मृतावर अवलंबित पत्नी, दोन मुले आणि आई यांचा विचार करून सव्वा कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी,
अशी मागणी दाव्यात करण्यात आली होती.

लोक अदालतमध्ये ८६ लाख रुपयांवर तडजोड झाली.
या तडजोडीसाठी अर्जदारांचे वकील अ‍ॅड. जी. पी. शिंदे, विमा कंपनीचे वकील अ‍ॅड. सुनील द्रविड आणि
विमा कंपनीचे अधिकारी सुखप्रीत सिंह आणि‌ अर्मिता सिंह यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Airport | पुणे लोहगाव विमानतळ! 30 विमाने वाढणार, तर प्रवासी 10 हजारांनी वाढणार