Mumbai High Court | ‘न्यायालयाच्या दीर्घकालीन सुट्ट्या कमी करण्याची अपेक्षा योग्य असली, तरी…’ – जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय

मुंबई: पोलीसानामा ऑनलाईन- भारतात कोर्टांना दिल्या जाणाऱ्या सुट्ट्या (Court Holidays In India) हा चर्चेचा आणि वाढच मुद्दा ठरत आहे. भारतात न्यायालयाला अनेक दिवसांच्या सुट्ट्या मिळत असतात. या सुट्ट्यांमुळे न्यायदानाच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो अशी चर्चा सातत्याने उठत आहे. या सुट्ट्या कमी करायला लावणारी एक जनहित याचिका (Public Interest litigation) मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) आली होती. त्यावर आता मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) सुनावणी सुरु झाली आहे. (Bombay High Court)

न्यायालयाला मिळणाऱ्या सुट्ट्या या ब्रिटिशकालीन (Colonial Era) विचार प्रणालीवर आधारित आहे. भारतात सध्या अनेक खटले प्रलंबित आहेत. त्यामुळे न्यायालयाने सारख्या सारख्या सुट्ट्या घेऊ नयेत, अशी मागणी दबक्या स्वरात होत आली आहे. दरम्यान या संदर्भात एक याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. सबिना लकडावाला (Sabina Lakdawala) या महिलेने मॅथ्यू नेदुमपारा (Mathews Nedumpara) आणि शरद कोळी (Sharad Koli) यांनी उन्हाळ्याची सुट्टी, गणपती, दिवाळी आणि नाताळच्या नावाखाली महिनाभर किंवा आठवडाभर येणाऱ्या सुट्ट्यांना याचिकेतून आव्हान दिले आहे. या सुट्ट्या केवळ उच्चभ्रू वकिलांच्या सोयीसाठी असतात. तातडीच्या प्रकरणांसाठी सुट्टीकालीन न्यायालय कार्यरत असले, तरीही संख्या कमी असल्याने न्याय मिळवण्याच्या मुलभूत अधिकारावर परिणाम होत आहे, असे ही याचिका म्हणते. (Mumbai High Court)

दिवाळी, नाताळ आणि उन्हाळ्यात न्यायालये पूर्ण बंद ठेवण्याऐवजी निम्म्या क्षमतेने चालवावीत.
न्यायालयांना सुट्ट्या देताना सर्व न्यायमूर्तींना एकदम सुट्टी नसावी. जेणेकरून न्यायदान थांबणार नाही,
अशी मागाणी ही याचिका करते. न्यायालयाच्या दीर्घकालीन सुट्ट्या कमी करण्याची अपेक्षा योग्य असली,
तरी न्यायमूर्तींच्या अपुऱ्या संख्येचा विचार होणे गरजेचे आहे. तसेच, या याचिकेवर वकील संघटनांची बाजू
ऐकणे आवश्यक असल्याने बार कॉन्सिल ऑफ इंडियाला (Bar Council Of India) नोटीस दिली जाणार आहे.
त्यांच्या प्रतिक्रियेनंतर पुढचा निर्णय घेतला जाईल.

Web Title :-  Mumbai High Court | plea at mumbai bombay high court opposing long leaves of court

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold and Silver Price | सोने पुन्हा महागले, पहा तुमच्या शहरातील किंमती

Pune Crime | …म्हणून मुलानं केलं आईसोबत भयंकर कृत्य; पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना

Eknath Khadse | ‘हिंमत असेल तर पूर्ण ताकदीने लढा’ – एकनाथ खडसे