Mumbai High Court | ‘राज्यपाल कोश्यारींना हटवा’, मागणी करणार्‍या याचिकेवर मुंबई हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – छत्रपती शिवाजी महाराज आता जुन्या काळातील नायक झाले आहेत, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले होते. त्यामुळे जनसामान्यांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. त्यावर महाविकास आघाडीने राज्यपालांना हटवा ही मोहीम राबविली आहे. राज्यपालांना पदावरून हटविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल करण्यात आली होती. पण या याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) नकार दिला आहे.

कांदिवलीतील रहिवासी दीपक जगदेव यांनी त्यांचे वकील नितीन सातपुतेंमार्फत राज्यपालांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी खंडपीठाने ही याचिका ताबडतोब सुनावणीस घेण्यास नकार दिला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर महाभियोगाची कारवाई करण्याबाबत जनहित याचिका कशी होऊ शकते? राज्यपालांना विशिष्ट वक्तव्य करण्यापासून रोखले जाऊ शकते का? राज्यपालांना घटनात्मक संरक्षण आहे, त्यामुळे ही याचिका मान्य का करावी, असे प्रश्न न्यायाधीशांनी याचिकाकर्त्यांना केले.

यावर याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. राज्यपाल या पदाला घटनात्मक संरक्षण असले,
तरी त्यांच्या वैयक्तिक आक्षेपार्ह टिप्पणीवरून त्यांच्याविरुद्ध महाभियोग चालविला जाऊ शकतो. ही आमची प्रमुख मागणी आहे, असे याचिकाकर्त्यांनी सांगितले. तसेच राज्यपालांनी जनतेतील एकोपा आणि शांतता बिघडवली आहे. त्यामुळे भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 61 आणि 156 अंतर्गत महाभियोगाची कार्यवाही करण्यात यावी. राज्यपालांना हटविण्याचा निर्णय घेण्यासाठी 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाची स्थापना करावी. महाराष्ट्रात दंगलीसदृश परिस्थिती निर्माण करण्यासाठी लोकांना चिथावणी दिल्याबद्दल कलम 153, 153अ, 124अ अन्वये फौजदारी कारवाई करावी. राज्यपालांवर फौजदारी कारवाई करण्याची प्रार्थना, लोकसभा आणि राज्य विधिमंडळाच्या अध्यक्षांना करावी, अशी मागणी यावेळी याचिकाकर्त्यांमार्फत करण्यात आली.

Web Title :- Mumbai High Court | remove the governor the bombay high court refused to hold an urgent hearing

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Navneet Ravi Rana | हनुमान चालिसा वादाप्रकरणी राणा दाम्पत्याच्या अडचणी वाढणार? न्यायालयाने जारी केले वॉरंट

Jalgaon News | …आणि शेतकऱ्यांना सावकाराच्या ताब्यातील मिळाली १०० एकर जमीन माघारी; जळगावच्या अधिकाऱ्याच्या तत्परतेने १५ कुटुंबांना न्याय