Mumbai High Court । ‘तपास केवळ अनिल देशमुखांपर्यंतच मर्यादित ठेवू नका’ – मुंबई हाय कोर्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai High Court । राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर टाकलेल्या लेटरबॉम्बवरून भ्रष्टाचार प्रकरणावरून त्यांची चौकशी सुरु आहे. तर, त्यांच्याशी संबंधित असलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी केवळ देशमुख यांच्याच भूमिकेचा तपास करू नका, तर त्यामध्ये सहभागी असलेल्या सर्वांचा तपास करा, याबाबत सूचना मुंबई हाय कोर्टाने (Mumbai High Court) दिल्या आहेत. तसेच, पुढील सुनावणी दरम्यान CBI ला तपास रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश देखील दिले आहेत. mumbai high court says dont limit investigation anil deshmukh, cbi active now

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

काय म्हणाले उच्च न्यायालय ?
मुंबई उच्च न्यायालयं (Mumbai High Court) म्हणाले की, ‘एप्रिलपासून आतापर्यंत या प्रकरणी किती तपास करण्यात आला ? असा सवाल उपस्थित केला. तपास कुठपर्यंत आला आहे. न्यायमुर्ती. एस. एस. शिंदे आणि न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने आज सुनावणी घेण्यात आली. तसेच, ‘तपास कुठवर आला आहे? सीलबंद तपास रिपोर्ट सादर करा. आम्ही तो वाचू आणि पुन्हा देऊ असं देखील उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर CBI ने 24 एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला. कोर्टाच्या निर्देशावरून अनिल देशमुख यांची प्राथमिक चौकशी केलीय. आणि त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ACB) व गुन्हा दाखल केला. हा गुन्हा रद्द करण्यासाठी अनिल देशमुख यांनी हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे. तपास सुरू असताना गुन्हा रद्द करता येईल का? असा सवाल कोर्टानं अनिल देशमुख यांचे वकील अमित देसाई यांना केला. तर हाय कोर्टाने आदेशावरून प्राथमिक चौकशी केली आहे. तसेच, गुन्हा नोंदवण्यात आला.

पुढं न्यायालयानं म्हटलं आहे की, ‘ यामध्ये सहभागी असलेल्या सर्वांच्या भूमिकेचा तपास करण्याचे CBI चे कर्तव्य आहे. फक्त याचिकाकर्त्यांच्याच (अनिल देशमुख) भूमिकेचा तपास करू नका.
त्यामध्ये सध्या बरखास्त केलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना पुन्हा सेवेत घेणाऱ्या समिती सदस्यांचा देखील समावेश आहे, असं न्यायालयानं म्हटलं आहे.
‘ही प्राथमिक चौकशी नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास वाढविण्यासाठी करण्यात यावी.
म्हणून हा तपास केवळ याचिकाकर्त्यां पुरताच मर्यादित ठेवू नका.
जे कोणी यात सहभागी आहेत, त्यांचा देखील तपास करा, असं म्हणत कोर्टाने FIR मधील ‘अज्ञात’ आरोपी कोण आहेत ? अशी विचारणा CBI कडे केलीय.

या दरम्यान, ‘सामान्यतः अज्ञात आरोपी हे चोरी अथवा दरोड्याचा प्रकरणांत असतात. या प्रकरणी तुम्ही प्राथमिक चौकशी केलीय.
असं कोर्टानं म्हटलं आहे. त्यावर CBI तर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अमन लेखी (Additional Solicitor General Aman lekhi) यांनी याबाबत पुढील सुनावणीत माहिती देऊ,
असं मुंबई उच्च न्यायालयानं सांगितलं आहे.
दरम्यान या याचिकेवर 7 जुलैपर्यंत सुनावणी तहकूब केली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram,
facebook page and Twitter for every update

Web Title : mumbai high court says dont limit investigation anil deshmukh, cbi active now

हे देखील वाचा

Coronavirus | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 13,027 ‘कोरोना’मुक्त, 6,740 नवीन रुग्ण

Pune Crime Branch Police | दरोड्याच्या तयारीत असलेल्या बबन व्यवहारे याच्यासह चौघांना गुन्हे शाखेकडून अटक

12 BJP MLA Suspended | 12 आमदारांच्या निलंबनाने सत्ताधार्‍यांची खुर्ची मजबूत होणार ?
जाणून घ्या

SPPU Pune University | पुणे विद्यापीठाच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षांची तारीख जाहीर,
‘या’ तारखेपासून सुरु होणार परीक्षा