Mumbai Local Train | मुंबई लोकलबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे याचं मोठं विधान; म्हणाले…

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Mumbai local train । राज्यातील ठाकरे सरकारने (Thackeray government) कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी असलेल्या पंचवीस जिल्ह्यात निबंध शिथिल केले आहेत. तसेच, उर्वरित11 जिल्ह्याचे निर्बंध मात्र कायम ठेवले आहेत. मुख्यतः म्हणजे मुंबई लोकलबाबत सरकारने कोणताही अद्याप निर्णय घेतला नाही. अजूनही लोकल ट्रेन (Mumbai local train) ही सेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद आहे. यावर लोकांनी नाराजी व्यक्त केलीय. तसेच विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Minister Raosaheb Danve) यांनी मुंबई लोकलबाबत (Mumbai Local) एक मोठं विधान केलं आहे.

यावेळी मुंबई लोकल या मुद्यावर बोलताना मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, ‘लोकलबाबत राज्य सरकारने (State Government) लोकांच्या मागण्यांचा विचार करावा.
राज्य सरकार तयारी दाखवेल त्याक्षणी लोकलला परवानगी द्यायला तयार असल्याचं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Minister Raosaheb Danve) यांनी म्हटलंय.
पुढे ते म्हणाले, ‘राज्य सरकारने आता राज्यातील निर्बंध शिथिल केल्याचा आधार घेत केंद्र सरकारला (Central Government) रेल्वे पूर्ववत सुरु करण्याची विनंती केली तर, आम्हाला काही अडचण नाही. राज्य आपली भूमिका जाहीर करत नाही तोवर केंद्र सरकार यामध्ये हस्तक्षेप करणार नाही.
कारण शेवटी राज्य कोरोना स्थिती हाताळत आहे, असे मंत्री दानवे यांनी स्पष्ट केलं आहे.

 

पुढे दानवेंनी म्हटलं आहे की, ‘राज्य सरकारने करोना स्थिती आटोक्यात आली आहे सांगत रेल्वे वाहतूक सुरु करण्याची विनंती केल्यास आम्ही परवानगी देऊ असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
या दरम्यान, लसीकरण झालेल्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा का देत नाही.
लसीकरण झालेल्यांना घरी बसायला लावू शकत नाही. त्यांच्याही अडचणी आहेत.
राज्य सरकारने लसीकरण झालेल्यांसाठी लोकल प्रवासाची मुभा देण्याबाबत विचार करावा अशी सूचना उच्च न्यायालयाने (High Court) सरकारला दिलीय.
याबाबत आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना प्रवास देण्याबाबत निर्णय़ होण्याची शक्यता आहे.

 

 

Web Title : Mumbai Local Train | bjp raosaheb danve on mumbai local maharashtra government

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pornography | युपी सचिवालयातील सचिवाचा पॉर्न व्हिडीओ व्हायरल, कॅमेऱ्यात झाला कैद

Maratha Kranti Morcha | मराठा क्रांती मोर्चासह इतर संघटनांची सोमवारी पुण्यात बैठक (व्हिडीओ)

IED Blast | छत्तीसगडमधील दंतेवाड्यात नक्षलवाद्यांचा सुरुंग स्फोटात १२ ग्रामस्थ जखमी