…म्हणून आरोपीची ४२ वर्षानंतर ‘त्या’ खटल्यातून निर्दोष सुटका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईतील ४२ वर्षापूर्वीच्या बलात्काराच्या प्रकरणातून नुकतीच एका आरोपीची निर्दोष सुटका करण्यात अली आहे. या प्रकरणात एका टेलरवर अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप होता. पीडित मुलगी आरोपीच्या नात्यातील होती. लाल मोहम्मद अजगरअली असे आरोपीचे नाव असून मुलीच्या आईने अजगरअली विरोधात तक्रार नोंदवली होती. १९७६ सालच्या या घटनेचा शिवडी सत्र न्यायालयाने निर्णय दिला आहे.
सांताक्रूझ येथे रहाणारे टेलर लाल मोहम्मद अजगरअली याच्यावर अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप होता. पीडित मुलगी आरोपीसोबत पळून गेल्याचे आणि दोघांमध्ये कुठल्याही प्रकराचे लैंगिक संबंध नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली. मुलीच्या आईने तक्रार नोंदवली होती. आरोपीने आपल्या मुलीबरोबर लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण त्यावेळी माझी मुलगी दुसऱ्याच्या प्रेमात असल्यामुळे तिने नकार दिला होता, असे पीडित मुलीच्या आईने पोलिसांना सांगितले होते. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर खेरवाडी पोलिसांनी या घटनेचा तपास केला होता.
घटनेच्यावेळी पीडित मुलगी महिना २० रुपये पगारावर घरकाम करायची आणि मालकाकडेच रहायची. पाच एप्रिल १९७६ रोजी मुलगी आणि आरोपी पळून गेल्याचे महिलेला समजले. पोलिसांनी मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन बलात्कार आणि अपहरणाचा गुन्हा नोंदवला. मुलीने त्यावेळी जी जबानी दिली होती त्या आधारावर न्यायालयाने आरोपी लाल मोहम्मद अजगरअलीची सुटका केली. मुलीने आरोपीबरोबर प्रेमसंबंधांची कबुली देताना आईच्या त्रासाला कंटाळून दिल्लीला निघून गेल्याची माहिती जबानीमध्ये दिली होती.

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्री विरोधात फसवणूकीची तक्रार दाखल