महाविकास आघाडी सरकारच्या कार्यक्रमाला मंत्री अनिल परब गैरहजर, राजकीय चर्चांना उधाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईच्या Mumbai पश्चिम उपनगरातील मेट्रो-2 अ आणि मेट्रो-7 च्या चाचणीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी (दि. 31) उदघाटन करण्यात आले. पण निमंत्रण पत्रिकेत नाव असूनही शिवसेना नेते परिवहन मंत्री अनिल परब Anil Parab गैरहजर राहिल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. परब यांच्यावर झालेल्या आरोपानंतर त्यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे ते सरकारवर नाराज आहेत का ? असाही प्रश्न उपस्थित केला जात असून चर्चांना उधाण आले आहे.

Pune : पुणेकरांना मोठा दिलासा ! लॉकडाऊन शिथिल करण्याबाबतचे आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून आदेश; जाणून घ्या काय सुरू अन् काय बंद

मुंबईचे Mumbai माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी खळबळजनक खुलासा केला होता. वाझेंनी एनआयएला लिहलेल्या पत्रात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अनिल परब Anil Parab यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात सध्या त्यांची चौकशी सुरू असून त्यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मेट्रो प्रवासाचा दुसरा टप्पा अखेर सुरु होण्याच्या मार्गावर आहे. एमएमआरडीएकडून आजपासून डहाणूकरवाडी ते आरे मेट्रो स्टेशनदरम्यान चाचणी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री ठाकरेंच्या उपस्थित हा सोहळा पार पडला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 1 (टी 1) आणि टर्मिनल 2 (टी 2) ला पोहोचण्यासाठी एमएमआरडीएकडून भुयारी आणि उन्नत मार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. 24 महिन्यात हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे.

Also Read This : 

कामाची गोष्टी ! कर्ज घेतले असेल तर ‘या’ 3 छोट्या चुका कधीही करू नका, होऊ शकते मोठे नुकसान;जाणून घ्या

संभाजीराजेंचा गंभीर आरोप, म्हणाले – ‘सरकार माझ्यावर पाळत ठेवतंय, माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहीत नाही’

‘प्रेमा’ला विरोध झाल्याने चुलत बहिण-भावाने केली ‘आत्महत्या’