Mumbai News | थरारक ! मुंबईत दिवसाढवळ्या वकिलावर तलवारीने सपासप वार, 3 जणांना अटक (व्हिडिओ)

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  मुंबईच्या (Mumbai News) बोरिवली भागात 10 ते 15 जणांच्या टोळक्याने भररस्त्यात एका वकिलावर तलवारीने जीवघेणा हल्ला (sword attack) केल्याची थरारक घटना घडली आहे. आरोपी भररस्त्यात वकिलावर तलावरीने सपासप वार करुन पळ काढतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी मुंबईतील (Mumbai News) एमएचबी पोलीस ठाण्यात (MHB Police Station) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक (Arrest) केली आहे. पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.

अ‍ॅड. सत्यदेव जोशी (Adv. Satyadeva Joshi) असं जखमी झालेल्या वकिलाचं नाव आहे.
ही घटना 8 जुलै रोजी घडल्याची माहिती समोर आली आहे.
हा हल्ला जमिनीच्या वादातून करण्यात आल्याचे समजतेय. मुंबईतील एका वकिलाने हल्ल्याचा व्हिडिओ ट्विट केला आहे.
अ‍ॅड. सत्यदेव जोशी यांच्यावर आज तलवार आणि अशा प्राणघातक शस्त्रे घेऊन कांदिवली येथील स्थानिक गुंडांनी हल्ला केला.
त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे ट्विट अ‍ॅड. मदन गुप्ता (Adv. Madan Gupta) यांनी केले आहे.

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक केली आहे.
कलम 307,326,324,504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे प्रकरण जमिनीच्या वादातून घडल्याचे सांगण्यात येत आहे.
व्हिडिओमध्ये काही गुंड वकिलाभोवती उभे राहून तलावरीने मारहाण करत असल्याचे दिसत आहे.
तर आजूबाजूला असलेले लोक मुकाट्याने उभे राहून हा प्रकार पहात असल्याचे दिसत आहे.
जोशींना वाचवण्याचा कोणीही प्रयत्न करत नसल्याचे दिसत आहे.

Web Title : Mumbai News | video sword attack on lawyer in mumbai in broad daylight shocking incident captured on camera

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Scholarship Online Application | विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन !

Gold Price Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण, जाणून घ्या मुंबई-पुण्यासह देशातील महत्वाच्या शहरांमधील आजचे दर

SBI ग्राहकांसाठी महत्वाची सूचना ! 30 सप्टेंबरपर्यंत करा ‘हे’ काम, अन्यथा बंद होऊ शकते तुमचे अकाऊंट