अखेर बाॅलीवूडचे संस्कारी बाबू अलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

मुंबई : पोलीसनामा आॅनलाइन –  #MeToo अभियांतर्गत बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत झालेल्या गैरवर्तनाबद्दल आवाज उठवला.  #MeToo मोहिमेमुळे अडचणीत सापडलेले ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांच्याविरोधात अखेर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी त्यांच्याविरोधात दखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. मात्र अद्यापपर्यंत त्यांना अटक करण्यात आलेली नाही. फिल्ममेकर नंदा यांनी आलोक नाथ यांनी त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप त्यांनी केला होता. अखेर मंगळवारी दुपारी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. जबरी आणि अनैसर्गिक संभोग केल्याप्रकरणी भादवी ३७६(१) आणि ३७७ ही कलमे त्यांच्यावर लावण्यात आली आहेत.
आलोकनाथ यांच्याविरोधात नंदा यांनी ८ ऑक्टोबरला एक लेखी तक्रारपत्र ओशिवरा पोलिसांना दिले होते. त्या तक्रारीची शाहनिशा केल्यानंतरच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे ओशिवरा पोलिसांकडून सांगण्यात आले होते.  या प्रकरणात आलोकनाथ यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते. त्यानंतर त्यांनी कायदेशीर मार्ग निवडत लेखिकेवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. आलोकनाथ यांच्या पत्नीने १२ आॅक्टोबर रोजी आंबोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती.
काय आहे प्रकरण –
फिल्ममेकर नंदा यांच्या राहत्या घरी आलोक यांनी त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप त्यांनी केला होता. #MeToo या मोहिमेअंतर्गत हे प्रकरण पुढे आले होते. याप्रकरणी अद्याप आलोक यांना अटक करण्यात आली नसून नंदा यांचे आरोप खोटे असल्याचा दावा आलोक यांनी केला होता. २५ ऑक्टोबरला त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती, मात्र त्यांना दिलासा मिळाला नव्हता. या धक्क्यातून सावरायला  खूप वेळ लागला. पण आज मुलींनी अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची गरज आहे असं सांगत त्यांनी आपल्या अत्याचाराला वाट मोकळी करून दिली होती. त्यानंतर अभिनेत्री संध्या मृदुल आणि दीपिका आमीन यांनीही आलोकनाथ सोबतचा त्याचा भयाण अनुभव माध्यमांसमोर आणला होता.
‘सिन्टा’कडून अभिनेते आलोकनाथ यांचं सदस्यत्व रद्द –
सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन अर्थात सिन्टानं अभिनेते अलोकनाथ यांचं सदस्यत्व रद्द केलं आहे. याबाबतचं परिपत्रक काल सिन्टा या संघटनेनं काढल आहे. दिग्दर्शक आणि निर्मात्या विनता नंदा यांनी अलोकनाथ यांच्यावर बलात्कार आणि लैंगिक छळवणुकीचे आरोप केले होते.या प्रकाराची सिन्टानं गंभीर दखल घेतली आहे. सिन्टानं अलोकनाथ यांना बाजू मांडण्यासाठी वेळ दिला होता. मात्र त्यांनी कसलाही प्रतिसाद दिला नाही.