Mumbai Pune Deccan Queen | मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस विशेष ट्रेनमध्ये व्हिस्टाडोम कोच, 8 ऑगस्टपासून बुकिंग सुरु

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  रेल्वेने ट्रेन क्रमांक 02123/02124 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई डेक्कन क्वीन (Mumbai Pune Deccan Queen) सुपरफास्ट एक्सप्रेस विशेष ट्रेनमध्ये (express special train) 15 ऑगस्टपासून एक व्हिस्टाडोम कोच (Vistadom Coach) जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गावर जोडण्यात आलेला हा दुसरा व्हिस्टाडोम कोच आहे. या मार्गावर पहिल्यांदा गाडी क्रमांक 01007/01008 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई -पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई डेक्कन एक्सप्रेस विशेष ट्रेनमध्ये (Mumbai Pune Deccan Queen) 26 जून पासून व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला आहे.

मुंबई –  पुणे या मार्गावरील प्रवाशांची मागणी लक्षात घेता आणि डेक्कन एक्स्प्रेसमध्ये लावण्यात आलेल्या पहिल्या व्हिस्टाडोम कोचला प्रवाशांचा मिळालेला चांगला प्रतिसाद पाहता.
आता डेक्कन क्वीन सुपरफास्ट एक्सप्रेस विशेष ट्रेनमध्येही एक व्हिस्टाडोम कोच जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नवीन जोडल्या जाणाऱ्या व्हिस्टाडोम कोच मधील विशेष ट्रेन क्रमांक 02123/02124
चे बुकिंग 8 ऑगस्ट पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर (Computerized Reservation Center) आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
कन्फर्म तिकिटे असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी असेल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानादरम्यान कोविड 19 शी संबंधित सर्व
नियमांचे व एसओपीचे (SPO) पालन करावे लागेल.

 

ट्रेन क्रमांक 02124 पुण्याहून 07.15 वाजता सुटेल आणि 10.25 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 02123 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून 17.10 वाजता सुटेल आणि 20.25 वाजता पुण्याला पोहोचेल.

विशेष गाडीला एक व्हिस्टाडोम कोच, 4 वातानुकूलित चेअर कार, 9 सामान्य द्वितीय आसन श्रेणी, 2 द्वितीय आसन श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि 1 पॅन्ट्री कार असणार आहे.

 

Web Title : Mumbai Pune Deccan Queen | Vistadom coach in Mumbai-Pune Deccan Queen Express special train, booking starts from August 8

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Tokyo Olympic 2020 | भारताचा स्टार भालाफेक नीरजने लिहीला सुवर्ण इतिहास

Police Patil Suspended | इंदापूर तालुक्यातील एका गावच्या राजकारणात भाग घेणं पडलं महागात, गावचा पोलीस पाटील निलंबित

Akola Rape Case | धक्कादायक ! अकोल्यात 22 वर्षीय विद्यार्थिनीवर प्रशिक्षकाकडून 4 वर्षे लैंगिक अत्याचार