Mumbai-Pune Expressway Accident | खोपोलीजवळ भीषण अपघात ! ५ जणांचा मृत्यु, ४ जण जखमी तर दोघांची प्रकृती गंभीर

पुणे : मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवेवर (Mumbai-Pune Expressway Accident) कारने कंटेनरला पाठीमागून जोरात धडक दिल्याने भीषण अपघात (Accident News) झाला असून त्यात ५ जणांचा जागीच मृत्यु (Death) झाला आहे. कारमधील अन्य ४ जण जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. कारचालक जखमी असून तो वेगवेगळ्या ठिकाणी राहणार्‍या लोकांना घेऊन मुंबईला चालला होता. (Mumbai-Pune Expressway Accident)

पुण्याहून मुंबईकडे जाणार्‍या एर्टिगा कारने रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी खोपोलीजवळील ढेकू गावाजवळ पुढे जाणार्‍या एका कंटेनरला पाठीमागून जोरात धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पडली. दरवाजा तुटल्याने आतील प्रवासी बाहेर उडून पडले. त्यात चार जणांचा जागीच मृत्यु झाला.

या अपघाताची माहिती मिळताच आर आर बी पेट्रोलिंग (RRB Patrolling), देवदूत यंत्रणा, बोरघाट वाहतूक पोलीस (Borghat Traffic Police), खोपोली पोलीस (Khopoli Police), डेल्टा फोर्स (Delta Force) यांनी तातडीने धाव घेतली. त्यांनी वाहनांतील लोकांना बाहेर काढून त्वरीत रुग्णालयात पाठविले. (Mumbai-Pune Expressway Accident)

अब्दुल रहमान खान Abdul Rahman Khan (वय ३२, रा. घाटकोपर), अनिल सुनिल सानप
(Anil Sunil Sanap), वसीम साजिद काझी Wasim Sajid Kazi (रा. राजापूर, जि. रत्नागिरी),
राहुल कुमार पांडे Rahul Kumar Pandey (वय ३०, रा. नवी मुंबई), आशुतोष नवनाथ गांडेकर
Ashutosh Navnath Gandekar (वय २३, रा. अंधेरी, मुंबई) अशी मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत.

कारचालक मच्छिंद्र आंबोरे Machindra Ambore (वय ३८, रा. पिंपरी चिंचवड), अमीरउल्ला चौधरी (Amirullah Chaudhary), दीपक खैराल (Deepak Khairal) हे जखमी झाले असून अस्फीया रईस चौधरी Asfia Rais Chaudhary (वय २५, रा. कुर्ला, मुंबई) हे किरकोळ जखमी झाले आहेत.

Web Title :- Mumbai-Pune Expressway Accident | Horrible accident at Khopoli! 5 dead and 4 people are in critical condition

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Deepak Kesarkar | राज्यातील खाजगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमधील कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान मंजूर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती

Chandrakant Patil | ठाकरे चूक सुधारत असतील तर आनंद होईल, चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान