Deepak Kesarkar | राज्यातील खाजगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमधील कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान मंजूर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील खाजगी विनाअनुदानित शाळांच्या (Unaided Schools) अनुदानाबाबतचा प्रलंबित प्रश्न शासनाने सोडवला असून घोषित, अघोषित, 20 टक्के अनुदान घेणाऱ्या, 40 टक्के अनुदान घेणाऱ्या तसेच त्रुटींची पूर्तता केलेल्या शाळांना यापुढे पुढील टप्प्यातील वेतन अनुदान (Salary Subsidy) लागू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. याचा सुमारे 60 हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लाभ होणार असून यासाठी अंदाजे 1160 कोटी रूपये इतका निधी मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सांगितले. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे (School Education Department) सचिव रणजित सिंह देओल (Ranjit Singh Deol) उपस्थित होते.

 

राज्यातील घोषित प्राथमिक (Primary), माध्यमिक (Secondary) व उच्च माध्यमिक शाळांच्या (Higher Secondary Schools) यादीतील त्रुटीत असलेल्या शाळांना अनुदानासाठी निधीसह पात्र करणे, यापूर्वी 20 टक्के/ वाढीव 20 टक्के अनुदान घेत असलेल्या शाळांना अनुदानाचा पुढील वाढीव टप्पा मंजूर करणे, मूल्यांकनात अनुदानासाठी पात्र अघोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना/ नैसर्गिक तुकड्यांना निधीसह अनुदानासाठी पात्र घोषित करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी जाहीर केले होते. त्यानुसार हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे हे शासनाचे उद्दिष्ट आहे.
शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्राने आठव्या स्थानावरून पहिल्या स्थानावर झेप घेतली असून
नवीन शैक्षणिक धोरणानुसार (New Education Policy) विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण देण्यावर भर देण्यात येत आहे.
शासनाने वेतन अनुदानाचा प्रलंबित प्रश्न सोडवल्यामुळे शिक्षणाचा दर्जा अधिक सुधारण्यास हातभार लागेल, असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे.

 

Web Title :- Deepak Kesarkar | Salary subsidy approved for employees of private unaided educational institutions in the state, informed by School Education Minister Deepak Kesarkar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maha Vikas Aghadi | स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात पदवीधर सिनेट निवडणुकीत महाविकास आघाडी विजयी

Pune PMC – PM Awas Yojana | पंतप्रधान आवास योजना बंद झाल्याने यापुढील काळात या योजनेअंतर्गत नवीन प्रकल्प नाही

BMC Elections | BMC च्या प्रभागाच्या संख्येवरून आता पालिका आणि राज्य निवडणूक आयोग नोंदवणार जबाब; उच्च न्यायालयाचे याचिका सुनावणीवेळी आदेश