Mumbai Pune Expressway | महत्वाची बातमी! पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर आज एक तासांचा ब्लॉक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे (Mumbai – Pune Expressway) वरुन आज प्रवास करणार असलेल्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. या मार्गावर आयटीएमएस प्रोजेक्ट (ITMS Project) अंतर्गत मोठे दिशादर्शक फलक बसवण्यासाठी दुपारी एक तासांचा ब्लॉक (Block) घेण्यात येणार आहे. आज १६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते १ दरम्यान पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. या मार्गावरील (Mumbai Pune Expressway) वाहतूक वळवण्यात आली आहे.

आयटीएमएस प्रोजेक्ट अंतर्गत मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाट (Borghat) हद्दीत आडोशी बोगदाजवळ (Adoshi Tunnel) km ४०/१०० व km ४०/९०० या ठिकाणी Gantry बसविण्यात येणार असल्याने या काळात म्हणजेच दुपारी १२ ते १ या वेळात पुण्याकडे जाणारी वाहतूक खालापूर टोल नाका (Khalapur Toll Gate) येथे तसेच शोल्डर लेनवर पूर्णपणे थांबविण्यात येईल.

यावेळी वाहतूक फक्त कारसाठी खोपोली एक्झिटवरून जुन्या महामार्गावरून शिंग्रोबा घाटातून मॅजिक पॉईंटवरून द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Expressway) वळविण्यात येईल. मागच्या आठवड्या येथे दोन तासांचा ब्लॉक घेतला होता.

आयटीएमसी प्रकल्प काय आहे…

  • मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर होणारे अपघात कमी करण्यासाठी इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम सुरु केली जाणार आहे.
  • ३४० कोटी रूपये खर्च करून उभारण्यात येणार आहे. यापैकी ११५ कोटी उभारणीसाठी आणि २२५ कोटी १० वर्षाच्या देखभालीसाठी कंत्राटदाराला दिले जातील.
  • आयटीएमएस सिस्टिमद्वारे वाहतुकीचे नियंत्रण सॅटेलाईटद्वारे होईल. यात ड्रोनचाही वापर केला जाईल.
  • महामार्गावर प्रवेश केलेल्या सर्व वाहनांची नोंद ठेवली जाईल. प्रवेश केलेल्या वाहनावर नजर ठेवली जाईल.
  • अपघात झाल्यास गाडीपर्यंत तातडीने मदत पोहचवली जाईल.
  • सीसीटीव्ही कॅमेरे लेन कटिंग करणाऱ्या वाहनांच्या नोंदी ठेवेन. वाहने टेक्नॉलॉजीशी कनेक्ट असणे गरजेचे आहे. यासाठी व्हेईकल डिटेक्शन सेन्सर गरजेचे असेल, म्हणजेच वाहनात जीपीएससारखे सेन्सर लावले जातील.
  • ब्लुटूथ आणि वाय-फायचा यासाठी वापर केला जाईल. नवीन वाहनांमध्ये ते इन बिल्ड असते.
  • सीसीटीव्ही कॅमेरे वाहतूक कोंडीवर सुद्धा लक्ष ठेवतील.
  • द्रुतगती मार्गावरुन धावणाऱ्या वाहनांना सेन्सरद्वारे अपघात अथवा वाहतूक कोंडीची माहिती मिळेल, संभाव्य धोका ओळखून ते आधीच नियंत्रण आणू शकतील.
  • द्रुतगती मार्गावर अवजड वाहन पार्क केल्यास सेन्सरमुळे त्याची माहिती मिळेल. अपघातानंतर घटनास्थळ क्षणार्धात लक्षात येईल, त्यानंतर मदत पोहचवली जाईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde On Uddhav Thackeray | ‘…तेव्हापासून हिंदुत्ववादी म्हणून घेण्याचा अधिकार
ठाकरेंना राहिला नाही’, एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल (व्हिडिओ)

Eknath Khadse On Udayanraje Bhosale | ‘शरद पवारांनी मार्गदर्शक व्हावं’,
उदयनराजे यांच्या विधानावर राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर,’उदयनराजेंनी आधी…’