CM Eknath Shinde On Uddhav Thackeray | ‘…तेव्हापासून हिंदुत्ववादी म्हणून घेण्याचा अधिकार ठाकरेंना राहिला नाही’, एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – CM Eknath Shinde On Uddhav Thackeray | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. 2019 साली मुख्यमंत्री होण्यासाठी ठाकरेंनी काँग्रेससोबत युती केली. तेव्हापासून हिंदुत्ववादी म्हणून घेण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना राहिला नाही. घरी बसून कारभार करणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता मतदान करणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. ते ठाण्यात पत्रकारांशी बोलत होते. (CM Eknath Shinde On Uddhav Thackeray)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, खेळ आणि राजकारण यात गल्लत करता कामा नये. बाळासाहेब ठाकरेंनी ज्या काँग्रेसला गाडण्याची भाषा केली, त्याच काँग्रेसला उद्धव ठाकरेंनी डोक्यावर घेतलं. तेव्हाच उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व कळले. बाळासाहेबांच्या विचारांना, हिंदुत्वाला त्यांनी तिलांजली दिली आहे. या राज्यातील मतदारांचा विश्वासघात केला. उद्धव ठाकरेंकडून बाकी अपेक्षा नाही. ते आता सगळ्यांशी युती करतील असा टोला त्यांनी लगावला.

https://x.com/mieknathshinde/status/1713528037764157897?s=20

मोदी बहुमतानं पंतप्रधान होतील

ज्यांनी बाळासाहेबांना विरोध केला, ज्या लोकांना बाळासाहेबांनी जवळ केले नाही. या सगळ्यांना हे जवळ करतील हेच उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व आहे. येणाऱ्या निवडणुकीत जनता गेल्या नऊ वर्षात मोदी सरकारने केलेले काम आणि वर्षभरात राज्यात आम्ही करत असलेल्या विकासकामांना नक्की पोचपावती देतील. घरी बसून कारभार करणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनता मतदान करत नाही. कितीही काहीही केलं, तरी मोदी बहुमतानं पंतप्रधान होतील, असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला.

कावीळ झालेल्यांकडून काय अपेक्षा करणार?

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केल्याशिवाय उद्धव ठाकरेंना चैन पडत नाही.
कारण, मोदींनी देशाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. ही पोटदुखी आणि जळफळाट आहे.
कावीळ झालेल्यांकडून काय अपेक्षा करणार? येणाऱ्या निवडणुकीत हिंदुत्वाचा मुखवटा जनता फाडून टाकेल.
कारण 21 पक्ष 2014, 2019 आणि आताही मोदींविरोधात एकत्र आले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Bandobast | पुणे शहरातील ज्यू धर्मियांच्या प्रर्थनास्थळ परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त

Pune Traffic Updates News | नवरात्रोत्सवानिमित्त पुणे शहरातील प्रमुख मंदिरांच्या परिसरातील वाहतूकीत बदल,
जाणून घ्या पार्किंग व्यवस्था आणि पर्यायी रस्ते

CM Eknath Shinde On Samruddhi Expressway Accident | ‘RTO ने ट्रक थांबवला अन्…’,
एकनाथ शिंदेंनी सांगितलं ‘समृद्धी’वरील अपघाताचे कारण (व्हिडिओ)